दुकानांचे अर्धे शटर सुरूच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:28 AM2021-04-16T04:28:38+5:302021-04-16T04:28:38+5:30
दुकानाचे अर्धे शटर सुरूच! चंद्रपुरातील व्यावसायिकांना लॉकडाऊन किंवा संचारबंदी लागू करण्यापूर्वी शिथिलता मिळेल, अशी अपेक्षा होती. लॉकडाऊनऐवजी दोन आठवड्यांची ...
दुकानाचे अर्धे शटर सुरूच!
चंद्रपुरातील व्यावसायिकांना लॉकडाऊन किंवा संचारबंदी लागू करण्यापूर्वी शिथिलता मिळेल, अशी अपेक्षा होती. लॉकडाऊनऐवजी दोन आठवड्यांची संचारबंदी लागू झाली. मात्र, व्यापारी संघटनांची नाराजी कायम आहे. कपडा, सराफा मुख्य बाजार व बंदी श्रेणीतील बरीच दुकाने बंद होती. काहींनी दुकानाचे अर्धे शटर उघडून वस्तू विक्री करत होते. तुकूम, बंगाली कॅम्प व बाबूपेठ परिसरात काही दुकाने नेहमीसारखीच सुरू होती.
संचारबंदी नावापुरती; कुणी कुठेही जा...
संचारबंदी कलम लागू झाल्याने विनाकारण घराबाहेर निघण्यास प्रतिबंध आहे. परंतु, गुरुवारी चंद्रपुरात कुणी कुठेही जा... असे चित्र पाहावयास मिळाले. त्यामुळे संचारबंदीचा फायदा काय, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.
ग्रामीण भागात प्रतिसाद
कोरोनाचे रुग्ण ग्रामीण भागातही वाढू लागल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत आहे. जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू केल्यानंतर गुरुवारी नागरिक व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तालुकास्थळावरील किराणा व मेडिकल स्टोअर्स वगळता अन्य दुकाने बंद होती.
पोलीस प्रशासनाची उदासीनता
पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे संचारबंदीचा पहिला दिवस वर्दळीचा ठरल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. चंद्रपुरात गांधी चौक, गिरणार, जटपुरा गेट, प्रियदर्शिनी चौक, वरोरा नाका, बसस्थानक परिसरात पोलीस तैनात होते. पण, मास्क न घालणाऱ्या व विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारताना दिसले नाही.