पाटण येथे सार्वजनिकस्थळी हात धुण्याची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:29 AM2021-09-25T04:29:39+5:302021-09-25T04:29:39+5:30
जिवती : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत पाटण येथे १५ व्या वित्त आयोगांतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर ...
जिवती : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत पाटण येथे १५ व्या वित्त आयोगांतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर व सार्वजनिक ठिकाणी हात धुण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी हाताची स्वच्छता राखावी, नियमित हात धुतल्याने श्वसनाचे विकार कमी होतात. होणारा आजार टाळता येतो, असे आवाहन ग्रामपंचायतमार्फत करण्यात आले.
यासोबतच पाटण पंचायत समिती गणामध्ये सोलर लाईट, हायमास्ट, शाळा व अंगणवाडी येथे आर.ओ. फिल्टर, चौकाचौकात बसण्याचे बेंच, हातपंप, आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण, महिला बालविकास या बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. याप्रसंगी पंचायत समिती सभापती अंजनाताई भीमराव पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील मडावी, ग्रामविकास अधिकारी रायपुरे, सरपंच सुषमा मडावी, उपसरपंच भीमराव पवार, सलीम शेख, सीताराम मडावी, प्रभाकर उईके, वागू उईके, अंकुश राठोड व गावकरी उपस्थित होते.
240921\img-20210924-wa0068.jpg
पाटण येथे हँड वॉश स्टेशन सह विविध विकास कामाचे उदघाटन