राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी हंसराज अहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2022 12:16 PM2022-11-26T12:16:25+5:302022-11-26T12:29:01+5:30
हंसराज अहीर यांना मिळाली नवी जबाबदारी
चंद्रपूर : माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा भाजप ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहीर यांची राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून निवड करण्यात आली आहे.
अहीर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे चारदा प्रतिनिधित्व केले. केंद्र सरकारच्या विविध समित्यांवरून आपल्या संसदीय कारकिर्दीत उल्लेखनीय कार्य केले. संघटनात्मक कार्यातून ओबीसी, भटके विमुक्त व अल्पसंख्याक समुदायाला भाजपशी जोडण्याचे भरीव कार्य केले.
मागासवर्गीय समाजाला न्याय्य हक्कांची जाणीव करून देत संघटन उभे केले. या कार्याची दखल घेत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. २०१९ च्या लाेकसभा निवडणुकीत ते पराभूत झाले. त्यानंतरही ते ‘ॲक्टिव्ह’ हाेते, हे विशेष! आता त्यांच्या नियुक्तीने हे पुनर्वसनाचा एकप्रकारे प्रयत्न आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी केलं अभिनंदन
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नियुक्तीनंतर हंसराज अहीर यांचं अभिनंदन केलं करत त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
Heartiest congratulations to Former Union Minister @ahir_hansraj bhaiyya for being appointed as the Chairperson of National Commission for Backward Classes.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 25, 2022
Wishing you a very successful tenure ! pic.twitter.com/9wD2vytJLl