रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:27 AM2021-05-23T04:27:14+5:302021-05-23T04:27:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मूल : गेल्या अनेक वर्षांपासून येथील प्रभाग क्रमांक १६ बौद्धविहारजवळील रस्त्याचे काम रखडले आहे. यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : गेल्या अनेक वर्षांपासून येथील प्रभाग क्रमांक १६ बौद्धविहारजवळील रस्त्याचे काम रखडले आहे. यामुळे या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे तत्काळ सिमेंटीकरण करण्यात यावे, अशी मागणी मूल येथील युवावर्गाने नगरपालिकेकडे केली आहे.
मूल येथील अत्यंत घनदाट वस्ती असलेल्या मूल येथील प्रभाग क्रमांक १६ बुद्धविहारजवळील सुमारे दीड ते दोनशे मीटर रस्त्याचे काम मागील अनेक वर्षांपासून रखडले आहे. मूल नगरपालिकेमार्फत हे काम पूर्ण करणे गरजेचे होते. या रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे थोडा पाऊस आला तरीही या रस्त्यावर पाणी साचते. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर रहदारी असल्यामुळे प्रशासनाने रखडलेल्या रस्त्याचे तत्काळ सिमेंटीकरणाचे काम पूर्ण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा निखील वाढई, प्रणित पाल, आकाश येसनकर, रोहित शेंडे यांनी प्रशासनाला दिला आहे.