आरोपीवर कठोर कारवाई करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 12:00 AM2017-09-24T00:00:50+5:302017-09-24T00:01:07+5:30

येथील पोलीस स्टेशन अंतर्गत कळमगाव (गन्ना) येथील आरोपी सम्राट अशोक रामटेके (३०) याने तेथीलच एका अल्पवयीन आदिवासी मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना....

The harsh action should be taken against the accused | आरोपीवर कठोर कारवाई करावी

आरोपीवर कठोर कारवाई करावी

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांना निवेदन: आदिवासी विकास परिषदेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्देवाही : येथील पोलीस स्टेशन अंतर्गत कळमगाव (गन्ना) येथील आरोपी सम्राट अशोक रामटेके (३०) याने तेथीलच एका अल्पवयीन आदिवासी मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना १० सप्टेंबरला अत्याचार पीडितेच्या आईने पोलीसात दिलेल्या तक्रारीवरून उघड झाली. त्यामुळे आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन आदिवासी विकास परिषदेचे सचिव केशव तिराणिक यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले.
अत्याचार पीडितेच्या आईने आत्याचाराची तक्रार पोलिसात दिली. यावेळी पोलिसांनी फिर्यादीच्या तोंडी तक्रारीनुसार प्रथम अपहरण घटना प्रकरनाची नोंद करूण घेतली. मात्र आरोपी सम्राट रामटेके याला ताब्यात न घेताच अत्याचार पीडितेस पोलीस स्टेशनला बोलावून तिचे रितसर बयानासह चंद्रपूर सामान्य रूग्णालयाचे वैद्यकीय अहवालाअंती अत्याचार झाल्याचे स्पष्ट होऊनसुद्धा याप्रकरणी प्रथम तक्रार दाखल कलम ३६३ चा गुन्हा १० सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. मात्र ३७६ अजूनपर्यंत दाखल करण्यात आला नव्हता. त्यामुळे पोलिसांच्या कामचुकारपणामुळे आरोपी सम्राटने परत अल्पवयीन अत्याचार पिडितेवर पाळत ठेवून पोलिसठाण्याच्या बाहेर पडताच तिचे १५ सप्टेंबर रोजी अपहरण घडवून आणले. या घटनेची तक्रार दाखल करण्यासाठी अत्याचार पिडीतेच्या आईने पोलिसात धाव घेतली असता तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही. त्यामुळे आरोपीवर कठोर कारवाई करुन जलदगती कायद्यातंर्गत कारवाई करावी, तसेच या घटनेप्रकरणी चालढकल करणाºया सिंदेवाही पोलिसांवर देखील कार्यवाही करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन आदिवासी विकास परिषदेचे सचिव केशव तिराणिक यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देणाºया शिष्टमंडळात श्रीरंग मडावी, हिरामण शेळमाके, अतुल कोडापे, गणपत पेंदाम, हंसराज गेडाम, रघुराज शेडमाके, होमचंद सिडाम, आनंदराव कुमरे, बाबुराव जुमनाके, माला गेडाम, गीता शेडमाके आदींचा समावेश होता.

Web Title: The harsh action should be taken against the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.