नाशिकचा हर्षवर्धन सदगीर महापौर चषकाचा मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 10:49 PM2019-02-11T22:49:51+5:302019-02-11T22:50:06+5:30
चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा रंगतदार समारोप नाशिकचा हर्षवर्धन सदगीरविरुद्ध मुंबईचा सतीश फडतरे या दमदार रोमांचकारी लढतीने झाला. मॅटवरील कुस्तीत रविवारी सायंकाळी झालेल्या खुल्या वजनी गटात मुंबईच्या सतीश फडतरेवर दणदणीत विजय मिळवत हर्षवर्धन सदगीर याने नाशिकसाठी विजेतेपद पटकावले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा रंगतदार समारोप नाशिकचा हर्षवर्धन सदगीरविरुद्ध मुंबईचा सतीश फडतरे या दमदार रोमांचकारी लढतीने झाला. मॅटवरील कुस्तीत रविवारी सायंकाळी झालेल्या खुल्या वजनी गटात मुंबईच्या सतीश फडतरेवर दणदणीत विजय मिळवत हर्षवर्धन सदगीर याने नाशिकसाठी विजेतेपद पटकावले.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे आयोजित केला जाणाऱ्या महापौर चषक कुस्ती स्पर्धेच्या लढती मोठ्या जल्लोषात पार पडतात. यावेळी ८ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारीदरम्यान कुस्ती स्पर्धा कोहिनूर क्रीडांगण येथे प्रेक्षकांच्या उत्साहात पार पडली. राज्यभरातून या दोन दिवसीय कुस्ती स्पर्धेसाठी तीनशेवर मल्लांनी सहभाग नोंदवला. तर हजारो कुस्तीप्रेमींना रोमांचकारी सामन्यांची पर्वणीच या निमित्ताने अनुभवायला मिळाली.
या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, लातूर, मुंबई, अहमदनगर, औरंगाबाद तसेच विदर्भातील पुरुष व महिला खेळाडू सहभागी झाले होते. पुरुष गटात ७० किलो गटात मूंबईचा सर्वेश यादव प्रथम असून ६५ किलो गटात प्रथम लातूरचा महेश तातपुरे, ६१ किलो गटात प्रथम गोविंद कपाटे, ५७ किलो गटात प्रथम राहुल कसारे, ५० किलो गटात प्रथम पंकज पाटील, ४५ किलो गटात प्रथम निखिल चौधरी, ४० किलो गटात प्रथम आकाश गड्डे, ३५ किलो गटात प्रथम अभिजीत ठानगे विजेते ठरले. तर महिला गटात ५३ किलो गटात अहमदनगरची धनश्री फंड विजेती ठरली असून इतर गटात, ४८किलो गटात प्रथम रेश्मा शेख, चंद्रपूर , ४४ किलो गटात प्रथम अंजली शाम, नागपूर, ४० किलो गटात प्रथम प्रियांका भोयर, चंद्रपूर, ३५ किलो गटात प्रथम वृषाली झंझाड, भंडारा विजेते ठरले. पंच म्हणून आनंद गायकवाड, रणवीरसिंह रावल, रामदास वडीचार, शरद टेकुलवार, छगनदेव पडगेलवार, धर्मशील कातकर, सुहास बनकर, अब्दुल फैझ काजी, नामदेव राऊत, विवेक बुरडकर, शुभांगी मेश्राम, शाम राजूरकर, मुरलीधर टेकुलवार, वैभव पारशिवे, कुणाल वडीचार यांनी काम पाहिले. स्पर्धेत विजयी पुरुष मल्लाला महापौर चषक, ७१,००० रुपयांचे रोख पारितोषिक व चांदीची गदा तसेच महिला विजेत्या मल्लाला महापौर चषक ३५,००० रुपयांचे रोख पारितोषिक व चांदीची गदा देण्यात आली. बक्षीस वितरण प्रसंगी महापौर अंजली घोटेकर, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, उपायुक्त गजानन बोकडे , नोडल अधिकारी विजय देवळीकर, गटनेते वसंत देशमुख, भारतीय पारंपरिक कुस्ती संघाचे विदर्भ उपाध्यक्ष रघुवीर अहीर, मोहन चौधरी उपस्थित होते.