दारू दुकाने सुरू झाल्याने इतर व्यवसायांना सुगीचे दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:29 AM2021-07-27T04:29:24+5:302021-07-27T04:29:24+5:30
दारूच्या दुकानाजवळ छोटे-मोठे व्यावसायिक पकोडे, ऑम्लेट विक्रेते यांचा आर्थिक जम बसलेला होता. मिळणाऱ्या कमाईमधून कुटुंबाचा गाडा सुरळीत सुरू ...
दारूच्या दुकानाजवळ छोटे-मोठे व्यावसायिक पकोडे, ऑम्लेट विक्रेते यांचा आर्थिक जम बसलेला होता. मिळणाऱ्या कमाईमधून कुटुंबाचा गाडा सुरळीत सुरू असताना, अचानक १ एप्रिल २०१५ पासून जिल्ह्यात दारूबंदी लावण्यात आल्याने बारजवळील परिसरातील या छोटय़ा-मोठ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. काहींनी स्वत:ला सावरत इतर व्यवसाय निवडला, तर काही पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरी करू लागले.
मात्र पाच-सहा वर्षांच्या कालखंडानंतर दारू व्यवसायावरील बंदी ६ जुलैला हटविण्यात आली. नवरगाव व परिसरात बंद पडलेल्या दारूच्या दुकानाजवळील व्यवसाय पुन्हा उभे राहिले आणि उपजीविकेचे साधन तयार झाल्याने पकोडे, भजी, ऑम्लेट व इतर व्यवसाय करणाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.