पारंपारिक टोपल्यांना सुगीचे दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:24 AM2021-02-08T04:24:40+5:302021-02-08T04:24:40+5:30
फोटो : फोटो घ्यावा चंद्रपूर : कोरोना संकटामुळे यावर्षी जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे ...
फोटो : फोटो घ्यावा
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे यावर्षी जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे समारंभाचे आयोजन केले जात आहे.
सध्या उन्हाळ्याची चाहूल सुरू झाली आहे. त्यामुळे लग्न सण समारंभाचेही आयोजन केले जात आहे. एरव्ही विशेष उपयोगात येत नसलेल्या सुप, टोपल्या, पारड्या, डाले आदी वस्तू खरेदीची लगबग सुरू झाल्याने पारंपरिक सुपं, टोपल्या आदींना सुगीचे दिवस आले आहे.
देवाच्या परडीची मागणी वाढली आहे. ग्रामीण भागात देवाच्या परडीला अशावेळी वेगळे महत्त्व असते. परडीत देव ठेवून त्याची पूजा केली जाते. लग्नसराईमुळे अशा परडीच्या मागणीत वाढ झाली आहे. यातही वेगवेगळ्या आकाराच्या परड्या उपलब्ध आहेत. लग्नघरी छोट्या आकाराच्या टोपल्याही अशावेळी महत्त्वाच्या असतात. त्या बनविण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत असल्याचे विक्रेते सांगतात.
विविध ठिकाणी दुकाने
शहरातील गांधी चौक, छोटा बाजार, तुकूम रोड, बंगाली कॅम्प परिसरात, तसेच गंजवार्डामध्ये या टोपल्या, डाले, परड्या आदींची विक्री केली जात आहे. याच काळात अशा टोपल्या आणि इतर साहित्याला मागणी असते. तसेच उन्हाळ्यातच बांबू वाळलेला असल्याचे त्याचा दर्जा चांगला असतो.