हार्वेस्टर यंत्राने लोप पावली बैलबंडीची मळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:50 AM2019-05-12T00:50:14+5:302019-05-12T00:50:39+5:30
धान मळणीसाठी बैलांची जुंपली जाणारी पात. शेतातली खऱ्यावरच केले जाणारे स्वयंपाक यामुळे धान मळणीच्या कामाची मजा काही औरच होती. या मजुपेढे धान मळणीच्या कामातून येणारे त्राण कमी होत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : धान मळणीसाठी बैलांची जुंपली जाणारी पात. शेतातली खऱ्यावरच केले जाणारे स्वयंपाक यामुळे धान मळणीच्या कामाची मजा काही औरच होती. या मजुपेढे धान मळणीच्या कामातून येणारे त्राण कमी होत होते. मात्र, आता धान मळणीसाठी बैलांच्या पातीची जागा हार्वेस्टर यंत्रांनी घेतली आहे. त्यामुळे धान मळणीची पूर्वीची मजा आता संपली आहे.
२१ व्या शतकात विज्ञानाने मोठी प्रगती केली आहे. रोेजच्या संशोधन तंत्राच्या बळावर तयार होत असलेल्या यंत्रानी मानवी जीवनाच्या परिघातील प्रत्येक बिंंदूला स्पर्श केला आहे. जे काम फक्त मानवच करू शकतो. असा दृढ समज मानवाचा होता. मात्र, हा समज यंत्रानी खोटा ठरविला आहे. कृषीप्रधान भारतात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. धानाची मळणी करण्यासाठी एक दशकापूर्वी बैल किंवा बैलबंडी हेच एकमेव मळणी यंत्र होते. पुढे टॅÑक्टरवर चालणारे मळणी यंत्र आले. आता तर त्याच्याही पुढचे तंत्रज्ञान म्हणजे, हार्वेस्टरचा वापर सुरू झाला आहे. हार्वेस्टरच्या वापरामुळे धानाची कापणी, बांधणी व मळणीचा खर्च वाचतो. त्यामुळे अनेक शेतकरी हार्वेस्टरचा वापर करीत आहेत. विशेष करून उन्हाळी धान पिकासाठी हार्वेस्टरचा वापर शेतकरी करीत असल्याचे दिसून येते.
कृषी क्षेत्रात यंत्रे आल्याने शेतीची अवघड कामे आता सोपी झाली आहेत. त्यामुळे यंत्रांचा वापर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत चालला असल्याचे दिसून येते.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, सिंदेवाही, मूल, नागभीड या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान पीके घेण्यात येत असून बहुतांश शेतकरी हार्वेस्टरचाच वावर अधिकाधिक प्रमाणात करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पूर्वीचे आठवडाभर चालणारी धान मळणी लोप पावत चालली आहे.
असे असते हार्वेस्टर यंत्र
उन्हाळी धान पिकाची कापणी उन्हाळ्यात होते. कडक उन्हाळ्यात धान पिकाची मळण्ी करणे शक्य होत नाही. कापणी व बांधणी करण्यास मजूर मिळत नाही. त्यामुळे हार्वेस्टर यंत्राचा वापर केला जातो. हार्वेस्टर यंत्र धानाची कापणी करतात. त्याच वेळी मळणीसुध्दा होते. मळणी झालेले धान यंत्राच्या डब्यात एकाच ठिकाणी जमा होते. एकाच वेळी सर्व कामे होत असल्याने शेतकरी वर्ग हार्वेस्टर यंत्राच्या वापराला पसंती दर्शवित आहेत. त्यामुळे पुर्वी आठवडाभर चालणारी धान मळणी आता काहीत तासात पूर्ण होते. परिणामी शेतकºयांचा बराच वेळ व मेहनत वाचते. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात हार्वेस्टर यंत्राचा वापर करताना दिसून येतात.