घरेलू कामगारांची नोंदणी केली का? नोंदणी करणाऱ्यांची संख्या कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 14:23 IST2025-01-28T14:22:43+5:302025-01-28T14:23:45+5:30

तुटपुंज्या पगारात घर चालविणे होते कठीण : कामगारांना विविध लाभ

Have domestic workers been registered? The number of those registering is low. | घरेलू कामगारांची नोंदणी केली का? नोंदणी करणाऱ्यांची संख्या कमी

Have domestic workers been registered? The number of those registering is low.

लोकमत न्यूज नेटवर्क 
चंद्रपूर :
घरगुती काम करणाऱ्या महिला, पुरुषांना अनेकवेळा तुटपुंजा पगारात स्वतःच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराव्या लागतात. मात्र, यातून ते शक्य होत नाही. त्यामुळे घरकाम करणाऱ्या महिला व पुरुषांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाच्या उद्योग ऊर्जा कामगार विभागाने घरगुती कामगारांसाठी कल्याण योजना सुरू केली आहे. त्यांच्याकडून माहिती घेऊन या कामगारांना विविध योजनांचा लाभमिळवून दिला जातो.


या योजनांच्या माध्यमातून कामगारांना जगणे सुसह्य होत असून अनेकांना याचा लाभसुद्धा मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अन्य कामगारांनीही नोंदणी करून योजनेचा लाभ घेणे आवश्यक आहे. 


कामगारांच्या पाल्यांना इयत्ता नववी ते बारावीकरिता तसेच आयटीआयचा कोर्स करत असल्यास दरवर्षी उत्तीर्ण होत असल्यास, दर तिमाहीकरिता ३०० रुपये जास्तीत जास्त दोन मुलांकरिता दिले जातात. मृत घरेलू कामगाराच्या कायदेशीर वारसाला अंत्यविधी साहाय्य दोन हजार रुपये मिळतात. घरेलू कामगाराला दोन अपत्यांपर्यंत प्रत्येक प्रसूतीकरिता पाच हजार रुपये शासनाकडून मदत केली जाते. पदविका अभ्यासक्रमासाठी मंडळातर्फे ९०० व पूर्वतयारी शिक्षणक्रमासाठी ६५० रुपये देण्यात येतात. विशेष म्हणजे, मोठ्या संख्येने घरेलु कामगार असतानाही शासनदरबारी अगदीच अल्प कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे अन्य कामगारांनीही नोंदणी करणे आवश्यक आहे.


१० हजार भांड्यांचा संच यंदा नोंदणी असणाऱ्या बहुतांश घरेलू कामगारांना मिळाला, तसेच वयाची ५५ वर्षे पूर्ण करणाऱ्यांना एकदाच १० हजार रुपये शासनाकडून मिळतात.


ही आहेत लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे 
आधार कार्ड, रहिवासी दाखला, पासपोर्ट आकाराचे फोटो, नोंदणी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, बँक खात्याचा तपशील, जेथे काम करत आहे तेथील मालकाचे संपूर्ण नाव व पत्ता.


चंद्रपूर शहरात अनेक घरेलू कामगार वंचित 
ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागामध्ये घरलू कामगारांची संख्या अधिक आहे. मात्र अनेक कामगार हे संघटनात्मक जुळलेले नसल्याने, नोंदणीकृत संस्थेत जोडले नसल्याने या कामगारांना लाभ मिळत नाही.


नोंदणी कोठे व कशी करायची?

  • जिल्हा सहायक कामगार अधिकारी यांच्याकडे नोंदणी करता येते. त्यासाठी अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे. 
  • महाराष्ट्रातील नागरिकांनाच या योजनेचा लाभ दिला जातो. अर्जदार घरगुती कामगार असणे आवश्यक आहे. 
  • घरकाम करणारा व्यक्ती केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरू असलेल्या अन्य योजनेंतर्गत लाभ घेता असता कामा नये. अर्जदार व्यक्तीची घरकाम कामगार संघटनेमध्ये नोंदणी आवश्यक आहे.


घरेलू कामगारांना हे मिळतात लाभ
नैसर्गिक मृत्यू - ३०,००० 
अपंगत्व  - ७५,००० 
अपघाती मृत्यू  - ७५,००० 
अंशतः अपंगत्व  - ३७,५००


 

Web Title: Have domestic workers been registered? The number of those registering is low.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.