हातावर पोट असणारे आर्थिक संकटात भरडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 05:00 AM2020-04-15T05:00:00+5:302020-04-15T05:01:35+5:30

तालुका व गावातील आठवडी बाजारापासून ते बाजार समित्यांचे व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे हातावर पोट असणारे माथाडी कामगार घरी बसून आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढविण्यात आला. भाजीपाला या बंदीतून वगळण्यात आला आहे. मात्र आठवडीबाजार व बाजार समितीमध्ये शेतीमालाचे होणारे लिलाव बंद आहेत. बाजार समित्यांचे व्यवहार ठप्प होऊन एक महिन्याचा कालावधी उलटून गेला.

 Having a tummy on hand will lead to financial crisis | हातावर पोट असणारे आर्थिक संकटात भरडणार

हातावर पोट असणारे आर्थिक संकटात भरडणार

Next
ठळक मुद्देकोरोनाचा फटका : हाताला काम नाही खिशात पैसे नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : हातावर पोट असणारा, अर्थव्यवस्थेच्या अगदी तळाशी असणारा आणि आर्थिक ताकद नसलेला कमजोर समुदाय लॉकडाऊनमुळे भरडण्याची चिन्हे दिसत आहेत. सद्यस्थितीत या समुदायाला प्रशासन व विविध सामाजिक स्वयंसेवी संस्थांकडून थोडी मदत मिळत आहे. मात्र, दररोज कष्ट केल्याशिवाय मजुरी मिळत नाही, अशी स्थिती असणाऱ्या या उपेक्षित कष्टकरी वंचित समुदायाला उद्याचे काय, हा प्रश्न भेडसावत आहेत.
तालुका व गावातील आठवडी बाजारापासून ते बाजार समित्यांचे व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे हातावर पोट असणारे माथाडी कामगार घरी बसून आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढविण्यात आला. भाजीपाला या बंदीतून वगळण्यात आला आहे. मात्र आठवडीबाजार व बाजार समितीमध्ये शेतीमालाचे होणारे लिलाव बंद आहेत. बाजार समित्यांचे व्यवहार ठप्प होऊन एक महिन्याचा कालावधी उलटून गेला. दररोज आलेला माल उतरून घेणे, दुसऱ्या गाडीत भरून देणे, यासारखी कष्टाची कामे माथाडी कामगार करतात. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते आपला उदरनिर्वाह चालवितात. परंतू गेल्या महिन्याभरापासून हे काम बंद आहे. त्यामुळे माथाडींवर घरी बसण्याची वेळ आली आहे. हाताला काम नाही, खिशात पैसे नाहीत, दिवस काढायचे कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. सध्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू आहे.
शासनाच्या गोदामातून गहू, तांदूळ रेल्वेने येतो. हे धान्य उतरवून ते वाहनामध्ये भरून देण्याचे काम काही कामगार करत आहेत. मात्र, ही संख्या कमी आहे. या उलट घरी बसणाऱ्यांची संख्या ९० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे वास्तव पुढे आले आहे. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील कारखान्यामध्ये सुमारे २०० माथाडी कामगार काम करतात. मात्र कारखाने बंद असल्याने कामगारांनाही काम नाही. त्यामुळे तेही घरी बसून असल्याने कुटुंबीयांची चिंता दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे.

फेरीवाले अडचणीत
लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील भाजी, फळविक्रेते वगळता अडीच हजार फेरीवाल्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. रोजचे उत्पन्नच थांबल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनामुळे संचारबंदी असल्याने बाजारपेठात शुकशुकाट आहे. भाजीपाला व फळविक्री करणारे वगळून इतर फेरीवाल्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. २० दिवसांपासून व्यवसाय बंद ठेवून फेरीवाले घरी बसले आहेत

कर्जफेडीचा कालावधी वाढवून द्यावा
काहींनी कर्ज काढून माल विकत आणला आहे. त्यामुळे व्यापाºयांचे पैसे कसे फेडायचे या विचारातआहेत. लहान मुलांची कपडे विक्री, होजिअरी, चहा, चायनीज विक्रेते, वडा, भजी, इडली, अप्पे, डोसा विक्रेते, भेल विक्रेते पानपट्टीवाले लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडले आहेत. फेरीवाले सावकारी पाशात अडकण्याचा धोका निर्माण झाला असून अशा प्रतिकूल परिस्थितीत मदत करण्याची गरज आहे. शासनाने बँकांना फेरीवाल्यांची हमी देवून हप्त्यांसाठी कालावधी वाढवून देण्याची मागणी फेरीवाल्यांनी केली आहे.

उधारीत उचलेला माल घराच
उत्पन्नच बंद झाल्याने काही कुटुंबीयांचे खाण्यापिण्याचे वांदे आहेत. उसणवारीवर उदरनिर्वाह सुरू असून बँकांचे हप्ते भरायचे कसे, हा प्रश्न आहे. अनेक फेरीवाल्यांनी व्यवसायासाठी तसेच मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घेतली आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांना हप्ते भरणे कठीण झाले आहे. बहुतांश फेरीवाल्यांना स्वत:चे घर नाही. भाड्याच्या घरात राहत असल्याने दुहेरी कोंडी झाली आहे.

Web Title:  Having a tummy on hand will lead to financial crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.