शेतीची अधोगतीकडे वाटचाल शेतकºयांसाठी धोक्याची घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 11:45 PM2017-09-10T23:45:31+5:302017-09-10T23:45:51+5:30
शेतपिकांची दिवसेंदिवस खालावत जाणारी स्थिती कृषी क्षेत्रावर अवकळा आणणारी आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून पाऊस अचानक गायब झाल्याने शेतीचे वाळवंट होण्याची भिती शेतकºयांना आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : शेतपिकांची दिवसेंदिवस खालावत जाणारी स्थिती कृषी क्षेत्रावर अवकळा आणणारी आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून पाऊस अचानक गायब झाल्याने शेतीचे वाळवंट होण्याची भिती शेतकºयांना आहे. शेतपिकांना पावसाची नितांत गरज असताना पाऊस येत नसल्याने शेतीची अधोगतीकडे वाटचाल सुरू झाली असून शेतकºयांसाठी ही धोक्याची घंटा आहे.
कृषी प्रधान देशातील बहुतांश शेती आजही निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. यावर्षी पाऊस अपुरा पडला. पावसाळा संपायला आला तरी धरणात अजुनही पाहिजे तसा जलसाठा नाही. नदी, नाले, तलाव, बंधारे अजुनही कोरडे आहेत. दरवर्षीपेक्षा यावर्षी पाण्याची भीषणता दर्शविणारे चित्र निर्माण झाले आहे. पावसाशिवाय शेती ही संकल्पनाच तशी निराधार आहे. पाऊस पडला तरच शेती पिकेल, हे एक कटू सत्य असताना यावर्षी निसर्गाने शेतकºयांकडे पाठ फिरविली.
कृषी क्षेत्र हे देशाचे प्राण समजले जाते. परंतु दिवसेंदिवस कृषी क्षेत्रावर आलेली अवस्था चिंतेची बाब आहे. निसर्ग पूर्वीसारखा शेतकºयांना साथ देत नाही. सरकारही शेतकºयांच्या पाठीशी नाही. यावर्षी शेतकºयांना कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागत असून दिवस-रात्रं काबाडकस्ट करणाºया शेतकºयांच्या हाती आलेले पीक उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे शेतकºयांनी काय करावे, याचा शासनाने विचार करण्याची गरज आहे.
करपलेले पीक आणि डोळ्यात अश्रूंच्या धारा
शेतात दिवसंरात्र काम करूनही शेवटी काहीच हाती लागत नाही. सारे काही व्यर्थ आहे. नापिकीने शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. त्यामुळे करपलेले पीक पाहून शेतकºयांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा दिसत आहेत.
कृषी क्षेत्रावर आज आलेली स्थिती वाईट आहे. पावसाअभावी शेतपिके करपायला लागली आहेत. दिवसंरात्र काबाडकस्ट करूनही शेतकºयांच्या हाती काहीच उरत नाही. त्यामुळे कृषी क्षेत्रावर अवकळा आली आहे.
- सुनील पिंपळशेंडे, शेतकरी, वनोजा.