नैसर्गिक पळसफुलांच्या रंगावर घातक रासायनिक रंगाची कुरघोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 10:29 PM2019-03-20T22:29:12+5:302019-03-20T22:29:27+5:30

धुळवडीच्या दिवशी वापरण्यात येणाऱ्या पळसफुलांच्या रंगावर आधुनिक रायायनिक घात रंगांनी कुरघोडी केल्यामुळे पळसफुलांचा रंग कालबाह्य झाल्याने तो दिसेनासा झाला आहे.

Hazardous chemical paint scarf on the nature of natural flora | नैसर्गिक पळसफुलांच्या रंगावर घातक रासायनिक रंगाची कुरघोडी

नैसर्गिक पळसफुलांच्या रंगावर घातक रासायनिक रंगाची कुरघोडी

googlenewsNext
ठळक मुद्देधुळवडीच्या दिवशी घातक रंगांचा वापर : पारंपरिक रंग झाला कालबाह्य

प्रकाश काळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : धुळवडीच्या दिवशी वापरण्यात येणाऱ्या पळसफुलांच्या रंगावर आधुनिक रायायनिक घात रंगांनी कुरघोडी केल्यामुळे पळसफुलांचा रंग कालबाह्य झाल्याने तो दिसेनासा झाला आहे. रासायनिक रंगाची धुळवडीच्या दिवशी मोठी उधळण करण्यात येत असल्यामुळे या रासायनिक रंगामुळे मानवी शरिरावर विघातक परिणाम होण्याचा धोका आहे.
जग झपाट्याने बदलल्याने काळनुरूप प्रथा, परंपरा चालीरिती बदलल्या आहेत. बदलणे हा काळाचा नियम असला तरी होळी व धुलिवंदनाच्या दिवशी वापरण्यात येणाऱ्या पळसफुलांपासून तयार करण्यात येणाºया रंगाचे अस्तित्व काळाच्या ओघात मागे पडले आहे. होळी सण जवळ येताच जंगलात जावून पळसाची फुले आणून त्यापासून रंग बनविला जायचा. या रंगाचे एक वेगळेच स्थान धुळवडीच्या दिवशी असायचे. प्रत्येकांच्या घरी पळसफुलांपासून बनविलेला रंग असायचा. या नैसर्गिक रंगाची नागरिक, लहान मुले, बालगोपाल, महिला, युवती, मुक्तपणे उधळण करायच्या. जंगल परिसरात पळसफुलांची मुक्त उधळण अनेकांना भुरळ घालायची. परंतु आता पळसफुलांचा रंग काळाच्या ओघात लुप्त झाल्याने त्याची जागा रासायनिक रंंगांनी घेतली आहे.
रासायनिक रंग एवढे घातक असताना ते शरिरावर अनिष्ट परिणाम करतात. चेहºयाला किंवा शरिरावर हे रासायनिक रंग लावले तर चेहरा खराब होण्याचा धोका असतो. या रासायनिक रंगाचा वापर करणे सर्वांनी टाळले पाहिजे. मात्र बाजारपेठेत होळीच्या निमित्ताने सजलेली रंगाची दुकाने आपल्याला भूरळ घालत असली तरी हे रासायनिक रंग अतिशय घातक आहे.
एकीकडे विज्ञानाने झपाट्याने यशाची उत्तुंग शिखरे गाठली असताना ‘जुनं ते सोनं’ या उक्तीप्रमाणे जे चांगले आहे, त्याचा स्वीकार करायला नागरिक तयार नाही. जंगले नष्ट झाल्याने माणसाने पळसफुलांच्या झाडावरही घाव घातला. त्यामुळे मुक्त नैसर्गिक उधळण करणारी पळसफुलांची झाडे दिसणे आता दुर्मिळ झाले आहै. आज धुळवडीच्या पार्श्वभूमीवर अज्ञान, आळस झटकून समाजातील वाईट प्रथा, परंपरा, होळीमध्ये दहन करून सर्वांनी रासायनिक रंगांची उधळण करणे टाळले पाहिजे.

Web Title: Hazardous chemical paint scarf on the nature of natural flora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.