कोरोना रुग्णांच्या सेवेत त्याने झोकून दिले स्वत:ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:26 AM2021-05-22T04:26:11+5:302021-05-22T04:26:11+5:30
आताच्या स्थितीत खासगी रुग्णालय असो की, शासकीय रुग्णालय, रुग्णांचे नातेवाईक रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत. रुग्णांना बेड उपलब्ध ...
आताच्या स्थितीत खासगी रुग्णालय असो की, शासकीय रुग्णालय, रुग्णांचे नातेवाईक रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत. रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्याची केविलवाणी विनंती करताना दिसत आहे. अशा व इतर कोणत्याही प्रकारच्या समस्या व अडचणीच्या वेळी मदतीचा हात देत असलेले एक ध्येयवेडे व्यक्तिमत्व म्हणजे चुनाळाचे सरपंच बाळू वडस्कर. रुग्णाला राजुऱ्यात उपचारासाठी अडचण येत असल्यास चंद्रपूर किंवा प्रसंगी नागपूरलासुद्धा ते रुग्णांना घेऊन जात आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या जवळ कोणी नसताना त्यांच्या नातेवाईकांसोबत स्वतः राहून, दुर्दैवाने रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधीची पूर्ण तयारी करण्यास अग्रस्थानी राहून शेवटच्या क्षणापर्यंत मदत करण्याचे धाडस करीत आहे.
बाळू वडस्कर यांना मध्यंतरी कोरोनाची लागणसुद्धा झालेली होती. जिवाची पर्वा न करता समाजसेवा अंगिकारून धाडसाने बाळू वडस्कर पुन्हा समोर आले. यांच्याकडे केवळ चुनाळाच नव्हे; तर गावोगावचे समस्याग्रस्त नागरिक मदतीसाठी मोठ्या आशेने येत आहेत. बाळू कुणालाही निराश करीत नाही. ते आरोग्य अधिकारी, आरोग्यसेवक, तहसीलदार, गटविकास अधिकारी व इतर अधिकारी कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून आलेल्या समस्यांचे निराकरण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहेत. महामारीत बाळू वडस्कर यांच्या धडपडीमुळे बऱ्याच रुग्णांचे प्राण वाचले आहेत.