ई-पीक नोंदणीसाठी तो करतोय शेतकऱ्यांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:30 AM2021-09-18T04:30:05+5:302021-09-18T04:30:05+5:30

प्रकाश काळे गोवरी : ई-पीक पाहणी कार्यक्रम राज्यात राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना मोबाइल ॲपद्वारे पिकांची ऑनलाइन नोंदणी करायची आहे. ...

He is helping farmers for e-crop registration | ई-पीक नोंदणीसाठी तो करतोय शेतकऱ्यांना मदत

ई-पीक नोंदणीसाठी तो करतोय शेतकऱ्यांना मदत

Next

प्रकाश काळे

गोवरी : ई-पीक पाहणी कार्यक्रम राज्यात राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना मोबाइल ॲपद्वारे पिकांची ऑनलाइन नोंदणी करायची आहे. मात्र ही माहिती भरायला शेतकऱ्यांना अडचण निर्माण होत आहे. काही शेतकऱ्यांकडे स्मार्ट फोन नसल्यामुळे शेतकऱ्यांना नोंदणी करणे अवघड झाले आहे. आपण शेतकरी पुत्र आहोत. शेतकऱ्यांच्या व्यथा, वेदना समजून घेऊन आपणही समाजाचे काही देणे लागतो या सामाजिक भावनेतून तो युवक शेतकऱ्यांना ई-पीक ऑनलाइन नोंदणी करून देत आहे.

राजुरा तालुक्यातील गोवरी येथील चेतन बंडूजी बोभाटे (२८) असे या युवकाचे नाव. ई-पीक पाहणी कार्यक्रम राज्यभरात महिनाभरापासून राबविण्यात येत आहे.शेतकऱ्यांच्या मोबाइलमध्ये ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड करून खरीप हंगामातील पिकाचे लागवड क्षेत्र, कोणत्या प्रकारचे पीक शेतात लागवड केले आहे. शेतात कोणती झाडे आहेत, सिंचनाची शेतात सुविधा आहे काय, यासारखी बरीच माहिती या ॲपवरून भरून शेतकऱ्यांना पिकांचा व स्वतःचा फोटो यामध्ये अपलोड करायचा आहे. साधारणता ही ई-पीक नोंदणीची प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी अत्यंत किचकट आहे. अस्मानी सुलतानी संकटात नेहमीच भरडल्या गेलेल्या व आर्थिक संकटात सापडलेल्या बहुतांश शेतकऱ्यांकडे स्मार्टफोनची सुविधा नसल्यामुळे शेतकऱ्यांना ई-पीक नोंदणी करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे ई-पीक नोंदणी कशी करायची? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मात्र आपणही समाजाचे काही देणे लागतो या सामाजिक भावनेतून चेतन बोभाटे हा युवक वेळोवेळी स्वतः शेतात जाऊन शेतकऱ्यांना ई-पीक नोंदणी करून देऊन मदत करीत आहे. एवढेच नाही तर पदवीचे शिक्षण घेतलेला हा युवक शेतकऱ्यांना वर्षभर विविध पिकांबाबत मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी नेहमीच कार्यतत्पर असतो.

170921\img_20210915_170752.jpg

ई_पीक नोंदणीसाठी चेतन करतोय शेतकऱ्यांना मदत

Web Title: He is helping farmers for e-crop registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.