ते जपताहेत वडिलोपार्जित कलेचा वारसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 12:38 AM2019-09-02T00:38:40+5:302019-09-02T00:39:30+5:30

मूल येथील रामशेट्टीवार बंधुंना गणपती मूर्ती तयार करण्याची कला प्रामुख्याने एका पिढीकडुन दुसऱ्या पिढीला मिळालेली आहे. ही कला कायम टिकून राहावी यासाठी आजच्या पिढीतील गणेश तुळशिराम रामशेट्टीवार यांनी आजोबा व वडीलांकडुन मूर्ती तयार करण्याची कला आत्मसात केली आहे, गणेश चतुर्थीच्या काळात सुमारे तीनशेच्या वर श्री गणेशाची विविध रूपे असलेली गणेशमूर्ती त तयार करतात.

He inherited the ancestral arts | ते जपताहेत वडिलोपार्जित कलेचा वारसा

ते जपताहेत वडिलोपार्जित कलेचा वारसा

Next
ठळक मुद्देपर्यावरणपूरक मूर्ती : दीडशे वर्षांची परंपरा कायम

भोजराज गोवर्धन।
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : वरदविनायक विघ्नहर्ताच्या आगमनाची उत्सुकता गणेशभक्तांना आहे. आता गणेशभक्तांची ही उत्सुकता संपणार असून गणरायाची संपुर्ण महाराष्ट्रात मोठया उत्साहात प्रतिष्ठापना होणार आहे. मूल येथील रामशेट्टीवार बंधुंनी दीडशे वर्षांपासून गणेशमूर्ती तयार करण्याची परंपरा आजही कायम ठेवली आहे. त्यांना मिळालेला हा कलेचा वारसा वडिलोपार्जित आहे. सर्वत्र महागाई आहे. मात्र गणेशभक्तांना महागाईचा फटका बसू नये, याची मूल येथील मूर्तीकार गणेश तुळशिराम रामशेट्टीवार हे काळजी घेत आहेत.
मूल येथील रामशेट्टीवार बंधुंना गणपती मूर्ती तयार करण्याची कला प्रामुख्याने एका पिढीकडुन दुसऱ्या पिढीला मिळालेली आहे. ही कला कायम टिकून राहावी यासाठी आजच्या पिढीतील गणेश तुळशिराम रामशेट्टीवार यांनी आजोबा व वडीलांकडुन मूर्ती तयार करण्याची कला आत्मसात केली आहे, गणेश चतुर्थीच्या काळात सुमारे तीनशेच्या वर श्री गणेशाची विविध रूपे असलेली गणेशमूर्ती त तयार करतात. त्यांच्या मूर्ती मूलसह सावली, सिंदेवाही, गडचिरोली, चंद्रपूर व परिसरात घेवून जातात. सदर मूर्ती बनविण्याचे काम साधारण मे महिन्यापासून सुरू होते. या कामात त्यांना वडील तुळशिराम रामशेट्टीवार यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे गणेश यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले. दरवर्षी सार्वजनिक गणेश मंडळाच्या मोठमोठया मूर्ती बनविण्याचे आर्डर ग्रामीण व शहरी भागातून घेतले जात आहे. सदर मूर्ती बनविण्यासाठी चांदापूर येथून चिकण माती आणून त्यापासुन गणेशमूर्तीला आकार दिला जात आहे. अतिशय रेखीव आणि सुंदर अशा गणेश मूर्ती ते मातीपासून तयार करतात. प्लास्टिक ऑफ पॅरीसचा वापर करीत नाही. आज ही कला शिकायची मानसिकता नव्या पिढीत नाही. मात्र रामशेट्टीवार कुटुंबात असे नाही.

एप्रिलमध्येच चिकन मातीचा साठा
सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीवर बंदी घातलेली आहे. यामुळे चिकन मातीच्याच मृर्ती करणे बंधनकारक आहे. त्यासाठी लागणारी चिकनमाती जवळपास उपलब्ध नाही, यामुळे चांदापूर येथील डोंगराळ भागातून वाहात आलेल्या चिकन मातीचा उपयोग गणेशमूर्ती बनविण्यासाठी केला जातो. यामुळे ही माती आणण्यासाठी आम्हाला एप्रिल महिन्यातच तयारी करून चिकन मातीचा साठा करून ठेवावा लागत असल्याचे मूर्तीकार गणेश रामशेट्टीवार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

भांडयापासून श्रीची मूर्ती
गणेश रामशेट्टीवार हे विविध वस्तूंपासूनही गणेश मूर्ती साकारतात. एका सार्वजनिक गणेश मंडळाने भांडयापासून मूर्ती बनवून देण्याचा आग्रह धरला. त्यांनी त्यांच्या आग्रहाला मान देत विविध भांड्यांपासून गणेशमूर्ती साकारली. यापूर्वीही अनेक सार्वजनिक गणेश मंडळांना त्यांनी काच, मोती व बदामपासूनही गणेशमूर्ती तयार करून दिली आहे.

Web Title: He inherited the ancestral arts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.