‘तो’ रेल्वेमार्ग पुन्हा उपेक्षितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 11:37 PM2018-02-07T23:37:13+5:302018-02-07T23:38:05+5:30

नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पात नागभीड - नागपूर या रेल्वे मार्गासाठी कोणतीही तरतूद करण्यात न आल्याने पुन्हा हा मार्ग उपेक्षितच राहिला आहे.

'He' railroad again neglected | ‘तो’ रेल्वेमार्ग पुन्हा उपेक्षितच

‘तो’ रेल्वेमार्ग पुन्हा उपेक्षितच

Next

घनश्याम नवघडे।
आॅनलाईन लोकमत
नागभीड : नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पात नागभीड - नागपूर या रेल्वे मार्गासाठी कोणतीही तरतूद करण्यात न आल्याने पुन्हा हा मार्ग उपेक्षितच राहिला आहे.
खरे तर ममता बँनर्जी रेल्वे मंत्री असताना १०६ कि.मी. लांबीच्या या नॅरोगेज मार्गास ब्राडगेजमध्ये रूपांतर करण्याची परवानगी देण्यात आली होती. पण प्रत्येक वेळेस अर्थसंकल्पात तरतूदच करण्यात येत नसल्याने हा मार्ग उपेक्षेचा बळी ठरत आला आहे.
दरम्यान, केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर आल्याने या सरकारकडून या मार्गाविषयी या भागातील लोकांच्या खूप अपेक्षा वाढल्या होत्या. या लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी निवडून आल्यावर काही दिवसातच नागभीड येथे रेल्वेच्या प्रमुख अधिकाºयांची बैठक घेऊन या मार्गातील अडचणी दूर करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे या अपेक्षेत आणखीच भर पडली होती. या बाबीस आता चार वर्षांचा कालावधी होत असला तरी या मार्गासाठी कोणतीही तरतूद होत नसल्याने लोकांच्या अपेक्षेवर पाणी फेरले जात आहे.
या मार्गास ७०८ कोटी ११ लाख रुपये खर्च असून यातील निम्मा वाटा राज्य सरकारने उचलायचा आहे. आणि राज्य सरकारने तशी कबुलीही दिली आहे, हे विशेष.
मध्य रेल्वेतील एकमेव मार्ग
मध्य रेल्वे विभागात जे काही रेल्वे मार्ग आहेत, त्या सर्व रेल्वे मार्गाचे ब्राडगेजमध्ये रूपांतर झाले आहे. केवळ नागभीड - नागपूर हाच एकमेव मार्ग नॅरोगेज उरलेला आहे. १०६ किमी लांबीच्या या रेल्वे मार्गाचे ब्राडगेजमध्ये रूपांतर झाल्यास चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, सिंदेवाही, नागभीड, ब्रम्हपुरी गडचिरोली जिल्ह्यातील वडसा, कुरखेडा, आरमोरी, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यातील पवनी व लाखांदूर या तालुक्यांना नागपूरसाठी अतिशय सोयीचा मार्ग ठरू शकतो. एवढेच नाही तर या भागातील कृषी उत्पादनासाठी या मार्गाच्या रूपाने नागपूरसारखी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते.

Web Title: 'He' railroad again neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.