तो... जागतो अन् शहर झोपते
By admin | Published: July 2, 2016 01:07 AM2016-07-02T01:07:52+5:302016-07-02T01:07:52+5:30
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस रात्री गस्त घालतात. त्याचा पोलिसांना मोबदला मिळत असतो.
नागरिक निश्चिंत : पोटासाठी जीव मुठीत मात्र मोबदला अल्प
चिमूर : गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस रात्री गस्त घालतात. त्याचा पोलिसांना मोबदला मिळत असतो. मात्र शासनाचा कुठलाही मोबदला नसताना जनतेनी दिलेल्या दातावर तो मागील एका तपापासून चिमूर शहरात जागतो अन चिमूरकर रात्रीला निश्चित होवून परिवारासह झोपतात.
मूळचा नेपाळ येथील बलमी गावचा रहिवासी असलेला लक्ष्मण ठाकूर (गोरखा) मागील १४ वर्षांपासून चिमूरकरांना एका सिट्टी व दड्यांच्या साह्याने पूर्ण रात्र जागून शहरातील गल्ली बोळातून फिरत जागते रहो.. असा आवाज देत चिमूरकराच्या लाखो रुपये किंमतीच्या मालमत्तेचे संरक्षण करीत आहे. चिमूर शहरात विविध शासकीय कार्यालये आहेत. सोबतच चिमूर शहरात मोठी बाजारपेठ आहे. चिमुरातील १५ हजार नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी लक्ष्मण ठाकूर (गोरखा) रात्री ९ वाजता घराच्या बाहेर पडतो. हातामध्ये एक लाकडी दंडुका व शिट्टी याच्या सहाय्याने गोरखा रात्रभर फिरत असतो. घरुन निघताना सकाळी घरी परत जाणार की नाही, याचाही हमी नसते. कारण कीर्र रात्री फिरताना पावसात निघणारे सरपटणारे प्राणी किंंवा दरोडा घालणारे दरोडेखोर यांच्या हल्ल्यातून कधी काय होणार, याचाही नेम नसतो. पाऊस, थंडीची तमा न बाळगता नागरिकांच्या जीविताची सुरक्षा करतो. मात्र त्याच्या श्रमाला आजही मोल मिळत नाही. त्यामुळे गोरख्याला मिळेल त्या पैशावर समाधान मानावे लागते. वेळ प्रसंगी नागरिक त्याला पाच रुपयाचे नाणेदेखील हातावर ठेतात. मात्र परिवाराच्या पालनपोषणासाठी तो स्वत: जागून दुसऱ्यांना सुरक्षा देत आहे.
गोरख्या (ठाकूर) आपली कर्मकहानी सांगताना म्हणाला की, पूर्वजापासून आत्मरक्षणाची कला आत्मसात केली अन् तीच कला नागरिकांना सुरक्षा देण्याच्या कामात येत आहे. यातून खुप कमी मोबदला मिळतो. त्यामुळे दोन मुलाचे शिक्षण कसे करावे हा प्रश्न ही उभा ठाकला आहे. बालाजी मंदिराच्या खोलीत राहत असल्याने किराया लागत नाही. मात्र मुलाचे शिक्षणाचा गंभीर प्रश्न पडला आहे. नागरिक दहा- २० रुपये देतात. त्यातून महिन्याला पाच- सहा हजार जमा होतात. त्यावरच आपली उपजिविका सुरू आहे. मात्र दिवाळीला कुणी भेट सुद्धा देत नसल्याची खंत लक्ष्मण (गोरखा) यांनी व्यक्त केली. मात्र मोबदला कमी असला तरी हे काम मी निरंतर करत राहणार असल्याचेही लक्ष्मण ने सांगितले. (प्रतिनिधी)
गोडे ज्वेलर्स दुकानातला मोठा दरोडा फसला
नुकताच भर वरणीतील गोडे ज्वेलर्स येथे दरोडेखोर दरोडा घालीन असताना गोरखाला एक व्यक्ती दिसला तेव्हा गोरखाने ओरड केली. मात्र गोरख्याला दरोडेखोरांनी गोटमार केली. या गोरख्याच्या ‘एन्ट्रीन’ जास्त प्रमाणात लुटणारा माल कमी नेता आला. त्यामुळे पूर्ण दुकान साफ करण्याचा प्रयत्न दरोडेखोरांचा फसला.
मागील १४ वर्षांपासून चिमूर शहरात रात्री ‘जागते रहो’ म्हणत चिमूरकरांना सेवा देत आहे. मात्र मोबदला खूप कमी मिळत आहे. वाढत्या महागाईत घर खर्च एवढ्याच्या रक्कमेत घर खर्च भागवते व मुलांचे शिक्षण करणे कठीण झाले आहे.
- लक्ष्मण ठाकूर (गोरखा), चिमूर