मुख्याध्यापकाकडून जीवे मारण्याची धमकी
By Admin | Published: July 10, 2015 01:32 AM2015-07-10T01:32:34+5:302015-07-10T01:32:34+5:30
कुंभेझरी येथील अण्णाभाऊ साठे शिक्षण संस्थेच्या कोषाध्यक्ष जयाबाई नरसिंग नामवाड शाळेत गेल्या असता मुख्याध्यापक दीपक तेलंग यांनी शिविगाळ करुन धक्काबुकी केली .
कुंभेझरीतील प्रकार : गुन्हा दाखल
गडचांदूर: कुंभेझरी येथील अण्णाभाऊ साठे शिक्षण संस्थेच्या कोषाध्यक्ष जयाबाई नरसिंग नामवाड शाळेत गेल्या असता मुख्याध्यापक दीपक तेलंग यांनी शिविगाळ करुन धक्काबुकी केली व शाळेबाहेर काढले. जिवे मारण्याची धमकीही दिली, अशी तक्रार जयाबाई नामवाड यांनी जिवती पोलिसात दिली. जिवती पोलिसांनी मुख्याध्यापक दीपक तेलंग, संचालक संतोष मातेवाड, संदीप कोचवाड सर्व रा. कुंभेझरी यांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
कै. अण्णाभऊ साठे शिक्षण संस्था कुंभेझरीेचा वाद धर्मदायआयुक्त कार्यालयात सुरु आहे. अण्णाभाऊ साठे विद्यालय कुंभेझरी येथे संस्थेच्या कोषाध्यक्षा जयाबाई नामवाड नेहमीप्रमाणे शाळेत गेल्या असता मुख्याध्यापक दीपक तेलंग यांनी शाळेत येण्यास मज्जाव केला व अश्लिल भाषेचा वापर करीत शिविगाळ करुन धक्काबुक्की करुन अपमानीत केले व जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी संस्थेचे संचालक संतोष मोतेवाड, संदीप कोचवाड मुख्याध्यापकांना सहकार्य करीत होते, असे तक्रारीत म्हटले आहे. याबाबतचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी गडचांदूर यांच्याकडे दिले असून गैरअर्जदार संतोष नामवाड, सुग्रीव गोतावळे, संदीप कोचवाड, दीपक तेलंग यांच्यापासून आपल्या कुटुंबास धोका असल्याचे म्हटले आहे. (वार्ताहर)