मुख्याध्यापक करमरकर यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:35 AM2021-02-25T04:35:41+5:302021-02-25T04:35:41+5:30
सावरगाव : दि.रूरल एज्यूकेशन सोसायटी ब्रम्हपुरीद्वारा संचालित नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील लोक विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.जी.करमरकर हे सेवानिवृत्त होत आहेत. ...
सावरगाव : दि.रूरल एज्यूकेशन सोसायटी ब्रम्हपुरीद्वारा संचालित नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील लोक विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.जी.करमरकर हे सेवानिवृत्त होत आहेत. यानिमित्त त्यांचा सोमवारी सत्कार करण्यात आला.
दि रुरल एज्युकेशन सोसायटी ब्रम्हपुरी या संस्थेचे अध्यक्ष तोंडरे, सचिव राऊत आणि श्री नागमोती यांनी अचानक सावरगाव लोकविद्यालय शाळेला भेट दिली आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी शाळेविषयी चर्चा केली. शाळेचे मुख्याध्यापक पी.जी. करमरकर हे २८ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी लोकविद्यालय सावरगाव येथे मुख्याध्यापक पदाचा प्रभार यशस्वी सांभाळला.
दरम्यान, पहिल्यांदाच संस्थेकडून मुख्याध्यापक पी.जी.करमरकर यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तोंडरे यांनी करमरकर यांच्या आजतागायत केलेल्या कार्यावर माहिती दिली आणि पुढील भावी काळातसुद्धा अशाचप्रकारे शाळेचा कारभार राहील, असे मत व्यक्त केले. यावेळी शाळेचे शिक्षक प्रतिनिधी कामडी व सर्व शिक्षकवृंद, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.