प्राचार्याने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

By admin | Published: November 23, 2015 12:55 AM2015-11-23T00:55:00+5:302015-11-23T00:55:00+5:30

कोरपना तालुक्यातील नांदा येथील वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय संस्थेचे सचिव व प्रभु रामचंद्र विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य ...

Headmistress Molestation | प्राचार्याने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

प्राचार्याने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

Next

आरोपीला अटक : शैक्षणिक क्षेत्रात खळबळ
गडचांदूर : कोरपना तालुक्यातील नांदा येथील वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय संस्थेचे सचिव व प्रभु रामचंद्र विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य तथा चंद्रपूर जिल्हा विनाअनुदानित कृती समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल रामचंद्र मुसळे (४५) रा. चंद्रपूर याला विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी गडचांदूर पोलिसांनी रविवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास चंद्रपूरच्या लक्ष्मीनगर स्थित निवासस्थानावरुन अटक केली. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
गुरूकुल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदा येथे बी.ए., बी.एस्सी व बी.कॉमची गोंडवाना विद्यापीठामार्फत परिक्षा सुरू होती. सदर केंद्रावर एकूण २९४ विद्यार्थी परिक्षा देत होते. शनिवारला बी. कॉमच्या तृतीय सेमिस्टरचा आयटीचा पेपर होता. याकरिता चंद्रपूर येथून २४ वर्षीय विवाहित विद्यार्थिनी परीक्षा देण्याकरिता परीक्षा केंद्रावर आली. तेव्हा ९ वाजता प्राचार्य अनिल मुसळे यांनी सदर मुलीला आपल्या कक्षात बोलाविले व खुर्चीवर बसण्याकरिता सांगितले. बसल्यानंतर काही वेळ प्राचार्यांनी तिच्यासोबत चर्चा केली. ९.३० वाजता पेपर आहे. मला पेपर द्यायला जायचे आहे म्हणून विद्यार्थिनी उभी झाल्यानंतर लगेच प्राचार्यांनी तिचा दुपट्टा ओढला व तिला पुन्हा बसविले. त्यानंतर तिची छेडछाड केली. त्याचवेळी दोन विद्यार्थी प्राचार्य कक्षाकडे येत असताना पाहून मुसळे हे स्वत:च्या खुर्चीवर जाऊन बसले. तेव्हा विद्यार्थिनी पेपर देण्यासाठी निघून गेली. ९.३० ते १२.३० पर्यंत पेपर सोडवून विद्यार्थिनी निघाल्यानंतर दोन मैत्रिणींना घडलेली आपबिती सांगितली व आपल्या घरी ती चंद्रपूरला निघून गेली. त्यानंतर सदर घटना सासू व पतीलासुद्धा सांगितली. त्यामुळे सायंकाळी तिघेही मिळून गडचांदूर पोलिसांत प्राचार्य अनिल मुसळे याच्या विरोधात तक्रार दाखल केली.
तक्रारीची गंभीर दखल घेत गडचांदूर पोलिसांनी ठाणेदार विनोद रोकडे यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर गाठले व रात्रीच त्याच्या निवासस्थानावरुन प्राचार्य अनिल मुसळेला अटक केली. पोलिसांनी प्राचार्यावर भादंविच्या कलम ३५४, ३५४ (अ), (१), ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान रविवारी सायंकाळी राजुरा न्यायालयाने अग्रीम जमानत मंजूर केला. (शहर प्रतिनिधी)

मला फसविण्याचा डाव : मुसळे
विद्यार्थिनीची तक्रार खोटी असून अशाप्रकारची कोणतीही घटना घडलेली नाही. तक्रारकर्तीने भ्रमणध्वनीवरुन माझ्याशी संपर्क साधला व माझ्या ठिकाणी दुसऱ्या मुलीला पेपर सोडवू द्या, अशी माझ्याकडे विनंती केली. आपण तिची मागणी फेटाळल्यामुळे तुम्हाला पाहून घेते म्हणून तिने धमकी दिली व तिने पोलिसात खोटी तक्रार दाखल केली.

Web Title: Headmistress Molestation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.