बल्लारपुरातील शिबिरात ३०० लोकांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:30 AM2021-08-22T04:30:22+5:302021-08-22T04:30:22+5:30
१५५ जणांवर होणार शस्त्रक्रिया बल्लारपूर : येथील श्री संत तुकाराम सभागृहात पार पडलेल्या नि:शुल्क रोगनिदान व उपचार शिबिरात ...
१५५ जणांवर होणार शस्त्रक्रिया
बल्लारपूर : येथील श्री संत तुकाराम सभागृहात पार पडलेल्या नि:शुल्क रोगनिदान व उपचार शिबिरात ३०० लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यातील १२५ जणांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया व इतर ३० लोकांची विविध आजारांवर शस्त्रक्रिया येत्या काही दिवसांत केली जाणार आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रिया वर्धा सावंगी येथील मेघे रुग्णालयात होईल.
श्री संत तुकाराम सेवा मंडळ, बल्लारपूर व बामणी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) समता फाैंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी डॉ. दीप्ती धनंजय सूर्यवंशी-पाटील यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी संत तुकाराम सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. पि. यु. जरीले होते. डॉ. दिनेश दुबे, सुरेश चरडे, विवेक झोडे, प्रा. राजेंद्र खाडे यांची मंचावर उपस्थिती होती. प्रास्ताविक राजेंद्र खाडे यांनी केले. संचालन विपुल लोढे यांनी केले, तर आभार सागर ठावरी यांनी मानले. याप्रसंगी प्रा. एम. यू. बोंडे, कमल वडस्कर, विनायक साळवे, मनोहर माडेकर, गजानन घुगुल, एस. पी. धांडे, प्रा. युवराज बोबडे, के. एम. पोडे, बी. एम. वडस्कर यांची उपस्थिती होती.