जामणी येथे आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:25 AM2021-02-07T04:25:59+5:302021-02-07T04:25:59+5:30
वरोरा : सर्वोदय शिक्षण मंडळद्वारा संचालित सुशिलाबाई रामचंद्रराव मामिडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क चंद्रपूर व नवयुवक मंडळ, गुरुदेव ...
वरोरा : सर्वोदय शिक्षण मंडळद्वारा संचालित सुशिलाबाई रामचंद्रराव मामिडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क चंद्रपूर व नवयुवक मंडळ, गुरुदेव सेवा मंडळ जामणी बुजरुक ता. वरोरा जिल्हा चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रा. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय शांताराम पोटदुखे यांच्या जयंतीचे औचित्य साधून जामणी येथे आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर पार पडले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. शिबिरात डॉ. बालमुकुंद पालीवाल, डॉ. पूजा पट्टीवार, डॉ. अभि परिहार, महाविद्यालयाचे रासेयो समन्वयक प्रा.डॉ. सुभाष गिरडे, प्रा. विश्वनाथ राठोड, प्रा. संतोष आडे, प्रा. किरणकुमार मनुरे आदी उपस्थित होते. यावेळी लहान मुलापासून ज्येष्ठापर्यंत आरोग्य तपासणी करण्यात आली. रक्तदान शिबिरात ३५ जणांनी रक्तदान केले. यावेळी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्त संक्रमण अधिकारी व त्यांची चमू, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील साकुरे, मुख्याध्यापक चंद्रशेखर कानकाटे, माणिकराव बोबडे, आनंदराव वराडकर, शंकरराव दातारकर, हरिभाऊ आमने, फुलभोगे, पवार, शिवणकर, मिलमिले, डोंगरकर आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी अनिकेत दुर्गे, प्रतीक्षा दुपारे, युवराज बांबोळे, हर्षल काळमेघे, अचल शेंडे नवयुवक मंडळाचे अनिकेत वासेकर, शुभम वासेकर, राजकुमार गोरकर, शुभम बदकल यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.