कोडशी येथे आरोग्य तपासणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:29 AM2021-05-21T04:29:09+5:302021-05-21T04:29:09+5:30
स्टुडंट फोरम ग्रुप शाखा, कोडशी खु. व ग्राम आरोग्य फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोरपना तालुका कोरोनामुक्त करणे हा ...
स्टुडंट फोरम ग्रुप शाखा, कोडशी खु. व ग्राम आरोग्य फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोरपना तालुका कोरोनामुक्त करणे हा ध्यास डोळ्यासमोर ठेवून ग्राम आरोग्य सेनेचे संस्थापक डॉ. प्रवीण येरमे यांच्या सहकार्याने निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ११०पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली. याचप्रमाणे ग्राम आरोग्य फाऊंडेशनच्या माध्यमातून कोरपना परिसरातील वडगाव तसेच इतर ठिकाणी शिबिर घेत एक हजारपेक्षा अधिक रुग्णांना तपासून बहुसंख्य रुग्णांना मोफत औषधे पुरविण्यात आली.
आज अशा बिकट परिस्थितीत सर्वसामान्य जनता भयभीत झाली आहे. रुग्णालयात जाण्यास घाबरत आहे. हेच निरखून स्टुडंट फोरम ग्रुपच्या संघटकांनी पुढाकार घेतला. यासाठी ग्राम आरोग्य सेनेचे रुग्णसेवक दिनेश राठोड, संजय सोयाम, कुमरे, नागो मेश्राम, रवी मडावी. संतोष मडावी, लक्ष्मण कोरांगे आदींनी सहकार्य केले.