५८ रुग्णवाहिकेवरुन चालतो आरोग्य विभागाचा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:32 AM2021-01-08T05:32:29+5:302021-01-08T05:32:29+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात ५८ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. यामध्ये ४८८ आरोग्य सेविकांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३२० पदे भरली असून, ...
चंद्रपूर जिल्ह्यात ५८ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. यामध्ये ४८८ आरोग्य सेविकांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३२० पदे भरली असून, १६८ पदे रिक्त आहेत. तर आरोग्य सेवकांची २३६ पदे मंजूर असून १६५ पदे भरली असून ७१ पदे रिक्त आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य सेवा पुरविण्यासाठी ५८ रुग्णवाहिका आहेत. आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रातून रुग्णांना इतरत्र हलविण्यासाठी अथवा आरोग्यसेवा पुरविण्यासाठी या रुग्णवाहिकेचा वापर केला जातो. याशिवाय संपूर्ण यंत्रणेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आरोग्य विभागाच्या मदतीला पाच चारचाकी वाहने आहेत. आरोग्य विभागाकडे सध्या अस्तित्वात असलेली वाहने अपुरे आहेत. याशिवाय लागणारे मनुष्यबळही अपुरे आहे. एका कर्मचाऱ्याकडे अनेक विभागाचा कारभार सोपविण्यात आलेला आहे. याशिवाय, लसीकरण आणि इतर साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणेला कोविडच्या काळामध्ये धावाधाव करावी लागत आहे.
कोट
जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाकडे ५८ रुग्णवाहिका असून, पाच प्रशासकीय वाहने आहेत. रिक्त पदांपैकी काही पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.
राजकुमार गहलोत, जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर
बॉक्स
रुग्णवाहिकेद्वारे केली जाणारी कामे
गरोदर मातांना प्रसूतीसाठी उपकेंद्र अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी पाठविण्यासाठी याशिवाय लसीकरण गावपातळीवर पोहोचविण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर केला जातो.
कोरोनाकाळात अत्यावश्यक सेवेसाठी रुग्णवाहिकेचा वापर आहे. याशिवाय गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णासाठी रुग्णवाहिकेचा वापर होतो.