उघड्यावरील चायनिज पदार्थामुळे आरोग्य धोक्यात
By Admin | Published: June 26, 2014 11:10 PM2014-06-26T23:10:18+5:302014-06-26T23:10:18+5:30
शहरामध्ये चायनिज सेंटरची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिथे जागा मिळेल तिथे चायनिज सेंटर सुरू आहे. अनेक ठिकाणी उघड्यावर चायनिज पदार्थांची विक्री केली जात असल्याने नागरिकांचे
राजुरा : शहरामध्ये चायनिज सेंटरची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिथे जागा मिळेल तिथे चायनिज सेंटर सुरू आहे. अनेक ठिकाणी उघड्यावर चायनिज पदार्थांची विक्री केली जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे.
शहरातील पंचायत समिती चौकात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात चायनिज सेंटर सुरू झाले आहे. युवक-युवती मोठ्या चवीने चायनिज वस्तु खाण्यासाठी जातात. परंतु या चायनिज वस्तुंची गुणवत्ता किती प्रमाणात योग्य आहे, याकडे पाहणे सुद्धा आवश्यक आहे.
रस्त्यावर खुर्च्या टाकुन हा धंदा सुरू असल्यामुळे एखादा भरधाव ट्रक येवून धडकला तर, मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या चायनिज वस्तुंमध्ये स्वाद वाढविण्यासाठी टाकण्यात येणारे पदार्थ शरीरासाठी हानीकारक असते. गुणवत्ता व स्वच्छता याचा अभाव असलेले अनेक चायनिज सेंटर राजुरा शहरात सुरू असून यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दिवसेंदिवस चायनिज सेंटरकडे जाणाऱ्याची संख्या वाढत असली तरी गुणवत्ता धारक वस्तु मिळण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी काही उपाययोजना केल्या जात आहे का, हे पाहणे गरजेचे आहे.
आरोग्य संवर्धन काळाची गरज आहे. आरोग्य संवर्धनासाठी कार्य करणारे अधिकारी मात्र केवळ देखावा म्हणून कार्यरत आहे. या चायनिज सेंटरची चौकशी करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, रस्त्याच्या अगदी कडेला उघड्यावर सुरु असलेल्या या व्यवसायामुळे अनेक वाहनधारकांना त्रासही सहन करावा लागत आहे. (शहर प्रतिनिधी)