दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 10:38 PM2018-07-31T22:38:16+5:302018-07-31T22:39:12+5:30
पावसाळ्याच्या तोंडावर वडगाव परिसरात मागील काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा सुरू आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. त्यामुळे शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, या मागणीचे निवेदन नागरिकांनी मनपा आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
Next
ठळक मुद्देशुद्ध पाण्याचा पुरवठा करावा : पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याला निवेदन
लोकमत
न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पावसाळ्याच्या तोंडावर वडगाव परिसरात मागील काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा सुरू आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. त्यामुळे शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, या मागणीचे निवेदन नागरिकांनी मनपा आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
चंद्रपूर शहराच्या पाणीपुरवठा योजनचे खासगीकरण करण्यात आले आहे. पाणीपुरवठ्याची जबाबदारी गुरूकृपा असोसिएशनकडे सोपविण्यात आली आहे. वडगाव परिसरात पाइपलाइन ठिकठिकाणी लिकेज आहे. त्याची दुरूस्ती करण्याची मागणीचे निवेदन अनेकदा देण्यात आले. मात्र त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली. आता पावसाळा लागला आहे. नळातून जंतू आणि दूषित पाणी येत आहे. असे पाणी आरोग्यासाठी घातक आहे. अतिसाराची लागण होण्याची शक्यता आहे.
३० जुलैला वॉर्डातील अनेक घरांच्या नळांतून दूषित पाण्यासोबत जंत अल्याने एकाच खळबळ उडाली. याची माहिती या भागातील पूजा विकास चौधरी त्यांनी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिली. माहिती मिळताच आपचे कार्यक्रर्ते वडगावात आले. त्यांनी पाहणी केली. त्यांनी याची माहिती पाणीपुरवठा विभाग व मनपाला दिली. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनीही तातडीने जाऊन पाहणी केली. त्यांना ही पाणी दूषित आढळून आले. या समस्येवर उपाययोजना करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी नागरिकांना दिले आहे.