आरोग्य यंत्रणा होणार व्यापक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 06:00 AM2020-03-29T06:00:00+5:302020-03-29T06:00:33+5:30

नागपूर विभागीय आयुक्त यांनी शनिवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना संबोधित केले. त्यानंतर झालेल्या जिल्ह्यातील विभाग प्रमुखांच्या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले ,चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते, आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

The health system will be widespread | आरोग्य यंत्रणा होणार व्यापक

आरोग्य यंत्रणा होणार व्यापक

Next
ठळक मुद्देकोरोनाचा संभाव्य धोका । ...तर एकाचवेळी शेकडोंवर करावा लागणार उपचार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यास येत्या काही दिवसात अतिशय विदारक परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशावेळी शेकडो रुग्णांवर उपचार करण्याची वेळ आरोग्य यंत्रणेवर येईल. त्यामुळे मोठया प्रमाणात आरोग्य यंत्रणेचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. मात्र आपल्या आजूबाजूच्या समाजावर ही वेळ येऊच नये, यासाठी केवळ आणि केवळ घरात राहणे हाच उपचार असल्याचे आवाहन पुन्हा एकदा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
नागपूर विभागीय आयुक्त यांनी शनिवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना संबोधित केले. त्यानंतर झालेल्या जिल्ह्यातील विभाग प्रमुखांच्या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले ,चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते, आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
कोरोना आजारावर केंद्र शासन राज्य शासनामार्फत संपूर्ण लॉकडाऊन केल्यानंतरही अनेक नागरिक त्याचे उल्लंघन करत आहे. अशा परिस्थितीत पाश्चिमात्य देशांमध्ये सुरुवातीच्या दुर्लक्षातून मोठया संख्येने अचानक रुग्ण वाढ झाली आहे. अशा वेळी हजारो लोकांवर एकाच वेळी उपचार करण्याची स्थिती निर्माण होते. अशावेळी सरकारी इस्पितळे यासोबतच खासगी हॉटेलपासून तर खुल्या मैदानाचीदेखील मदत घ्यावी लागू शकते. त्यासाठी आरोग्य यंत्रणेतील सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण विभाग स्तरावर सुरू करण्यात आलेले आहे. चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात गडचिरोली व चंद्रपूर येथील आरोग्य कर्मचाºयांचे प्रशिक्षण सुरू होत आहे. जिल्हा प्रशासनाने अशावेळी महत्त्वाच्या जागादेखील बघून ठेवल्या आहेत.
अन्नधान्याची वाहतूक करणाºया ट्रक चालकांना संचारबंदीच्या काळात परवाना पासेस देण्यासाठी उपप्रादेशिक अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी ०७१७२-२७२५५५ हा दूरध्वनी क्रमांकावरून मदत घेण्याचे आवाहन उपप्रादेशिक अधिकारी विशंभर शिंदे यांनी केले आहे.
जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडणार नाही. भाजीपाला, किराणा, अंडी, मांस, तसेच हॉटेलचे किचनसुद्धा सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. घरपोच सेवा तसेच पार्सल सुविधा प्रत्येक हॉटेलच्या किचनमधून उपलब्ध करण्याचे निर्देशदेखील जिल्हाधिकाºयांनी दिले आहे.
महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसेच ग्रामीण भागात बाहेर गावावरून नजीकच्या काळात आलेल्या नागरिकांचा प्रशासनाकडून शोध घेण्याचे काम सातत्याने सुरू ठेवण्यात आले आहे.
सोबतच जे नागरिक अन्य राज्यातून अन्य जिल्ह्यातून व अन्य ठिकाणावरून अडकून पडले असेल, त्यांची देखील नोंद घेतली जात आहे. कोणाचीही उपासमार होऊ नये, यासाठी प्रशासनाच्या सर्व यंत्रणेने याकडे लक्ष द्यावे, असेही जिल्हाधिकाºयांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्याच्या रक्तपेढीत रक्ताचा पुरवठा कमी असून रक्तदात्यांनी या काळामध्ये रक्तदान करावे व जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये रक्त जमा होईल, याकडे सर्व रक्तदात्यांनी लक्ष वेधावे, असे आवाहनही जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड यांनी केले आहे.

निराधार, निराश्रितांची हयगय होणार नाही
या बैठकीनंतर विभाग प्रमुख यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी कोणत्याही परिस्थितीत निराधार, निराश्रित, बेघर, विमनस्क लोकांना जेवणाची व निवासाची दूरवस्था होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिले. यासोबतच त्यांनी जिल्ह्यामध्ये अन्य राज्यातील जिल्ह्यातील जे नागरिक अडकून पडले असतील. विद्यार्थी, कर्मचारी ज्यांच्याकडे किचनची सुविधा नाही, अशा सर्वांचीच व्यवस्था महानगरपालिकेच्या कम्युनिटी किचनमार्फत व शहरातील सामाजिक संस्थांमार्फत करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी महानगरपालिकेच्या ०७१७२-२५४६१४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र ही सुविधा निराधार, निराश्रित, विमनस्क व बेघर लोकांसाठीच असून त्याच लोकांनी याचा लाभ घ्यावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

पारडीचे ४० व्यक्ती अडकले पुणे, मुंबईत
नागभीड : रोजगारासाठी पुणे व मुंबई येथे गेलेले पारडी (ठवरे) येथील ४० संचारबंदीमुळे अडकले आहेत. गावाकडे परत येण्यासाठी धडपड सुरू आहे. पण, अद्याप त्यांना यश आले नाही. तालुक्यातील शेकडो नागरिक दरवर्षी रोजगाराच्या शोधात स्थलांतरण करतात. त्यानंतर जून महिन्यात गावाकडे परत येतात. रोजगारासाठी पुणे व मुंबई येथे गेलेले पारडी येथील ४० व्यक्ती संचारबंदीमुळे परत येऊ शकले नाही. त्यामुळे कुटुंबीयांची घालमेल सुरू झाली आहे.

७७ जणांना होम क्वारंटाई
चिंधी चक : नागभीड तालुक्यातील ओवाळा येथून रोजगारासाठी बाहेरगावी जाऊन परत आलेल्या ७७ जणांना आरोग्य प्रशासनाने क्वारंटाईन केले. वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या हातावर क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आले. खबरदारी म्हणून अशा व्यक्तींनी बाहेर कुठेही न फिरता घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.

रेशन कार्डावर अन्नधान्य वितरित
जिल्ह्यांमध्ये, शहरांमध्ये ज्यांच्याकडे स्वयंपाकाची व्यवस्था आहे, त्यांच्या रेशन कार्डवर त्यांना एक महिन्याचे अन्नधान्य वितरण जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत सुरू करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे अन्नधान्य नसेल त्यांनी आपला रेशनवरील अन्नधान्य कोटा घेऊन जावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अद्याप एकही रुग्ण पाझिटिव्ह नाही
वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यामध्ये २८ मार्च रोजी विदेशात जाऊन आलेल्या नोंदणीकृत नागरिकांची संख्या १०९ आहे. सध्या निगराणीत असणारे नागरिक ४९ आहेत. १४ दिवसांचा निगराणी कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या ६० आहे. इन्स्टिट्यूशन कॉरेन्टाईन करण्यात आलेले नागरिक सहा आहेत. जिल्ह्यात अद्याप एकही रुग्ण पॉझिटिव्ह नसून आतापर्यंतचे सर्व नमुने निगेटिव्ह आले आहे.

पाच दुकानदारांवर कारवाई
बल्लारपूर : साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी नगर परिषद पथकाने शनिवारी येथील भावना किराणा स्टोअर्स, अनुप प्रोव्हीजन, मनोज कोतपल्लीवार, अंजु मामीडवार, श्याम बैस या पाच दुकानदारांविरूद्ध दंडात्मक कारवाई केली. शहरात विनाकारण फिरताना आढळलेल्या नागरिकांनाही कारवाई करण्याची ताकीद नगर परिषद, तहसील कार्यालय, पोलीस प्रशासनाने दिली.

राज्याबाहेर असलेल्यांची केली सोय
राज्याबाहेर तेलंगणामध्ये ९२९ तर आंध्रमध्ये २३ मजूर अडकून पडले आहेत. या सर्वांना त्या-त्या जिल्ह्यांमध्ये खानदानाची व्यवस्था व निवाºयाची व्यवस्था करण्याबाबत संबंधित जिल्हाधिकाºयांना शनिवारी पत्र देण्यात आले आहे. या सोबतच जिल्ह्यामध्ये अन्य राज्यातील ९५२ जणांची नोंद झाली आहे.

Web Title: The health system will be widespread

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.