चंद्रपुरात गुरुवारपासून आरोग्य महामेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 10:52 PM2019-01-15T22:52:39+5:302019-01-15T22:53:12+5:30
केंद्र सरकारच्या स्वास्थ व परिवार कल्याण मंत्रालय व राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूर जिल्हा अंतर्गत चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील जनतेच्या सदृढ आरोग्यासाठी येथील चांदा क्लब ग्राऊंडवर १७ व १८ जानेवारी रोजी रोगनिदान, उपचार व आरोग्य प्रदर्शन महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. या शिबिरात सुमारे १२ हजार रुग्णांना सेवा देण्याचा मानसही ना. अहीर यांनी व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केंद्र सरकारच्या स्वास्थ व परिवार कल्याण मंत्रालय व राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूर जिल्हा अंतर्गत चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील जनतेच्या सदृढ आरोग्यासाठी येथील चांदा क्लब ग्राऊंडवर १७ व १८ जानेवारी रोजी रोगनिदान, उपचार व आरोग्य प्रदर्शन महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. या शिबिरात सुमारे १२ हजार रुग्णांना सेवा देण्याचा मानसही ना. अहीर यांनी व्यक्त केला.
१७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता ना. हंसराज अहीर यांच्या हस्ते या महामेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहतील. विशेष अतिथी म्हणून वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित राहतील. पत्रकार परिषदेला चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. बी. राठोड व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे उपस्थित होते.
१७ जानेवारीला मिळणाऱ्या सेवा
हृदयरोग. मधूमेह, मुत्रपिंडाचे आजार, अस्थिरोग, मानसिक आजार, मिरगी, चर्म्ररोग, एचआयव्ही/एड्स, कान, नाक, घसा, नेत्र, गर्भाशयाचे आजार या आजारांची तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी व औषधोपचार संपूर्ण आयुष चिकित्सा (आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी) दंत तपासणी, मौखिक आरोग्य तपासणी व उपचार. रक्त, सिकलसेल / थॅलेसेमिया, शुगर, इ.सी.जी. या तपासणी लहान मुलांची संपूर्ण आरोग्य तपासणी व उपचारमॅमोग्राफी मशीनद्वारे महिलांची स्तन कॅन्सर तपासणी व उपचारगंभीर आजारासाठी संदर्भ सेवा व शस्त्रक्रियेची सुविधाआरोग्य विषयक समस्या व शंकेबाबत सल्लामसलत व मार्गदर्शन, चर्चासत्र. विविध आरोग्य विषयक प्रदर्शन
१८ जानेवारीला मिळणाऱ्या सेवा
लहान मुलांची संपूर्ण आरोग्य तपासणी व उपचारलहानमुलांमधील मधूमेह तपासणी व उपचारमधूमेहग्रस्त मुलांच्या पालकांसाठी तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शनरक्त, सकलसेल/थॅलेसेमिया, शुगर व इ.सी.जी. तपासणी होईल.