‘दिल का पत्थर’ अन् फेसाळणारा धबधबा

By admin | Published: July 19, 2016 01:00 AM2016-07-19T01:00:35+5:302016-07-19T01:00:35+5:30

एकीकडे माणिकगड पहाडाच्या उंचच उंच पर्वतरांगा व किर्रर जंगलाच्या वाटेत निसर्गरम्य जांभूळधऱ्या धबधबे आहे ते ओसंडल्याने

'Heart of stone' fluttering waterfall | ‘दिल का पत्थर’ अन् फेसाळणारा धबधबा

‘दिल का पत्थर’ अन् फेसाळणारा धबधबा

Next

पावसाळी पर्यटन : निसर्गाच्या सानिध्यातील जांभूळधऱ्याचे धबधबे ओसंडले
जयंत जेनेकर ल्ल कान्हाळगाव (कोरपना)
एकीकडे माणिकगड पहाडाच्या उंचच उंच पर्वतरांगा व किर्रर जंगलाच्या वाटेत निसर्गरम्य जांभूळधऱ्या धबधबे आहे ते ओसंडल्याने त्याचे सौंदर्य डोळ्यात साठवून घेण्यासाठी निसर्गप्रेमी पर्यटक गर्दी करीत आहेत.
कोरपना या तालुका मुख्यालयापासून १२ ते १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या जांभूळधरा गावालगतच्या जंगलात चार छोटे-मोठे धबधबे आहेत. पहाडाच्या उंच कपारीवरून पडणाऱ्या त्यांच्या तुषार वर्षात आंघोळ करण्याची मजा काही वेगळीच प्रतीत करते.
संपूर्ण जंगलाची वाट खळ-खळणारा नाल्याची असल्याने अनेक रोमांचकारी अनुभव जाताना येतात. या भागातील जंगलात विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींचे वृक्ष आहेत. या रस्त्यावरच हृदयाच्या आकाराचा दगडही आहे. त्यामुळे त्या दगडाला अनेकजण ‘दिल का पत्थर’ असेही संबोधतात.
प्राकृतिकदृष्ट्या हा भाग कुठे उंच तर कुठे सखल असल्याने या वाटेने जाण्याचा अनुभव ‘डर के आगे ही जीत’ असाच आहे. अनेक रंगबिरंगी फूलपाखऱ्यांची मुक्त उधळण पाहावयास मिळते. तेव्हा जांभूळधऱ्याला जाण्याचा बेत आखाच !
येथे कसे पोहोचाल?
४जांभूळधऱ्यातील धबधबे पाहण्यासाठी कोरपनावरून दोन मार्ग असून त्याद्वारे जांभूळधरा गावापर्यंत जाता येते. एक मार्ग कोरपना-कान्हाळगाव - मांडवा - टांगाळा व दुसरा मार्ग पारडी-रूपापेठ हा आहे. जांभूळधरा गावापासून मात्र पायदळच जंगल व नाल्याच्या वाटेनेच येथे जावे लागते. या भागात कुठल्या खासगी किंवा एसटी बसची सोय नाही.

पर्यटनदृष्ट्या उपेक्षित
४कोरपना तालुक्यातील जांभूळधरा धबधबासह भीमलकुंड धबधबा, बोदबोधी झरण चांगले पर्यटनस्थळ आहे. मात्र शासनस्तरावर त्यांची उपेक्षाच असल्याने ही स्थळे विकासांपासून कोसो दूर आहेत.

Web Title: 'Heart of stone' fluttering waterfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.