मनपा राबविणार ‘हीट अ‍ॅक्शन प्लॉन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 01:38 AM2018-03-15T01:38:46+5:302018-03-15T01:38:46+5:30

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. चंद्रपूर हॉट सिटी म्हणून ओळखले जाते. दरवर्षी येथील सूर्याचा पारा उच्चांक गाठतो. अशा तप्त उन्हामुळे नागरिक उष्माघाताला बळी पडू नयेत, यासाठी चंद्रपूर महानगरपालिका हीट अ‍ॅक्शन प्लान राबविणार आहे.

'Heat Action Plan' will be implemented | मनपा राबविणार ‘हीट अ‍ॅक्शन प्लॉन’

मनपा राबविणार ‘हीट अ‍ॅक्शन प्लॉन’

Next
ठळक मुद्देआयुक्तांची तातडीची बैठक : आपत्ती व्यवस्थापन सज्ज

ऑनलाईन लोकमत
चंद्रपूर : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. चंद्रपूर हॉट सिटी म्हणून ओळखले जाते. दरवर्षी येथील सूर्याचा पारा उच्चांक गाठतो. अशा तप्त उन्हामुळे नागरिक उष्माघाताला बळी पडू नयेत, यासाठी चंद्रपूर महानगरपालिका हीट अ‍ॅक्शन प्लान राबविणार आहे. त्यासाठी सोमवारी तातडीची बैठक घेऊन आपत्ती व्यवस्थापन सज्ज करण्यात आले आहे.
वातावरणातील उष्णतेमुळे मानवी शरिरावर तसेच सृष्टीतल्या इतर जीव-जंतूवर दुष्परिणाम होतात. उष्णतेच्या निगडीत आजारपण व मृत्यू टाळता येणे शक्य आहे, तरी दरवर्षी अनेक लोक उष्णतेच्या दुष्परिणामांना बळी पडतात. उन्हाळ्यात वाढत्या तापमानाची झळ ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात जास्त जाणवते. गेल्या काही वर्षात चंद्रपूर शहराने उन्हाळ्यामध्ये उष्णतेच्या तीव्र लाटी अनुभवल्या आहेत. ‘उष्णतेची लाट’ ही एक नैसर्गिक आपत्ती आहे, ज्याचे आपत्ती व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून दर उन्हाळ्यात चंद्रपूर मनपाद्वारे उष्माघात कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे प्रस्थापित केलेल्या ‘शित-वार्ड’ मध्ये सन २०१६ मध्ये २७ व सन २०१७ मध्ये एकूण २० उष्माघात रुग्ण भरती झाले असून औषधोपचारानंतर सर्व रुग्ण बरे झाले व एकही उष्माघात मृत्यू झाला नाही. विशेष म्हणजे सन २०१६ मधील उन्हाळ्यात चंद्रपूरचे सर्वाधिक तापमान ४६.८ नोंद केले गेले असून सन २०१७ मध्ये ते ४७.२ होते.
चंद्रपूर मनपाच्या आरोग्य विभागातर्फे तयार केलेल्या या उष्माघात कृती आराखड्याची अंमलबजावणी उन्हाळ्यात करण्यात येणार आहे. मनपाने गठीत केलेल्या हिट अ‍ॅक्शन प्लॅन समन्वय समितीची बैठक सोमवारी मनपा आयुक्त संजय काकडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त भालचंद्र बेहरे व मनपा अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या सदस्यांना मनपा हिट अ‍ॅक्शन प्लानबाबत अवगत करण्यासाठी मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. अंजली आंबटकर यांनी पॉवर पॉर्इंटद्वारे त्याचे सदरीकरण केले. त्यानंतर समिती सदस्यांनी आपत्ती व्यवस्थापनादरम्यान काय करावे, याबाबत सूचना देण्यात आल्या. मनपा आयुक्त संजय काकडे यांनी सभेत केलेल्या मार्गदर्शनात उष्माघात प्रतिबंधाबाबत व्यापक जनजागृती, बगिचे सुरू राहण्याच्या वेळेत वाढ, स्वयंसेवी संस्था व चिल्ड वॉटर असोसिएशनतर्फे पिण्याच्या पाण्याच्या पाणपोईची जागोजागी उपलब्धता, १०८ रुग्णवाहिकेचा सहभाग, बांधकाम कंत्राटदाराद्वारे मजुरांच्या कामाच्या वेळेत बदल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व उष्माघात जनजागृती आदीबाबत सूचना दिल्या.

हे करा
उन्हाच्या उष्णतेमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम टाळण्यास भरपूर पाणी प्यावे, इतर थंड पेय उदा. ताक, आंब्याचे पन्ह, नारळ-पाणी प्यावे, अत्यावश्यक असल्याशिवाय उन्हात जाऊ नये, सैल व फिकट रंगाचे कपडे घालावेत, थंड जागेत, वातावरणात राहावे तसेच भर उन्हात म्हणजे साधारणत: दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत उन्हात काम करणे टाळावे.

अशी आहेत लक्षणे
अस्वस्थपणा, थकवा येणे, शरीर तापणे, अशक्तपणा, अंगदुखी, डोकेदुकी, मळमळ ही उष्माघाताची लक्षणे असून असे आढळल्यास थंडगार पाण्याने आंघोळ करावी (डोक्यावरुन गार पाण्याने आंघोळ केल्यास तापलेले शरीर थंड होण्यास मदत होते) थंड जागेत आराम करावा, परिश्रमाचे काम करु नये, भरपूर थंड पाणी प्यावे, तसेच मनपा आरोग्य केंद्रात किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात त्वरित औषधोपचार करवून घ्यावा.

Web Title: 'Heat Action Plan' will be implemented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.