परतीचा पाऊस दमदार शेतकरी सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 11:14 PM2017-09-15T23:14:03+5:302017-09-15T23:14:19+5:30

परतीच्या पावसाने गुरूवार व शुक्रवारी जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली.

Heavy rain drizzle farmers | परतीचा पाऊस दमदार शेतकरी सुखावला

परतीचा पाऊस दमदार शेतकरी सुखावला

Next
ठळक मुद्देसिंचन प्रकल्प कोरडेच : आतापर्यंत केवळ ४७ टक्के पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : परतीच्या पावसाने गुरूवार व शुक्रवारी जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. मात्र अद्यापही जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांत पाण्याचा ठणठणाट असून मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४७ टक्के पाऊस झाला आहे.
गुरूवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. तर शुक्रवारीही दुपारी १५ वाजताच्या सुमारास चंद्रपूरसह काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकºयांना काही प्रमणात दिलासा मिळाला असून वातावरणातही गारवा निमारण झाला आहे. परंतु, यावर्षी जिल्ह्यात अद्यापही मोठा पाऊस झालेला नसल्याने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प अद्यापही कोरडे आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४७.७५ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षी १५ सप्टेंबरपर्यंत १२०१.५९ च्या सरासरीने १८०२३ मिमी पाऊस झाला होता.
गुरूवारी १०५ मिमी पाऊस
परतीच्या पावसाने शेतकरी काहीसा सुखावला असला तरी हा पाऊस काही भागातच झाला. गेल्या २४ तासात जिल्ह्यात ७.०३ च्या सरासरीने १०५५ मिमी पाऊस झाला असून शुक्रवारच्या पावसाची आकडेवारी उपलब्ध झाली नाही.

Web Title: Heavy rain drizzle farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.