१२ तालुक्यात पावसाची झळ, कामे खोळंबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:19 AM2021-07-09T04:19:13+5:302021-07-09T04:19:13+5:30
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी दिली होती. त्यानंतर कडक उन्ह निघाल्याने सलग १५ दिवस नागरिकांना उकाडा सहन ...
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी दिली होती. त्यानंतर कडक उन्ह निघाल्याने सलग १५ दिवस नागरिकांना उकाडा सहन करावा लागता. मान्सूनने झोडपल्या नंतर पावसाचा वेग यापुढेही कायम राहील, असे वाटत होते. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारली. गत आठवड्यात पुन्हा बरसला. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करणाऱ्या वरोरा, राजुरा, कोरपना, जिवती, भद्रावती, गोंडपिपरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली. गुरूवार पासून पुन्हा पावसाची झळ सुरू झाली. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी सुखावला आहे तर सोयाबीन व कपाशी उत्पादक मशागतीच्या प्रतीक्षेत आहेत.
८ जुलैपर्यंत तालुकानिहाय पाऊस (मिमी)
चंद्रपूर ३२७. ३
बल्लारपूर ३८१
गोंडपिपरी ३६९.४
पोंभूर्णा २३९.३
मूल ३२९.९
सावली २८९
वरोरा २८७.५
भद्रावती २१८.१
चिमूर ३७६.४
ब्रह्मपुरी ३६२.६
सिंदेवाही ३४८.८
नागभीड ३७०.३
राजुरा २१३.४
कोरपना ३९२.५
जिवती ३५७.४५
सरासरी पाऊस ३२४.२