नऊ तालुक्यांतील अतिवृष्टीने दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:17 AM2021-07-24T04:17:58+5:302021-07-24T04:17:58+5:30

बॉक्स चार धरणांच्या सांडव्यातून पाणी विसर्ग अतिवृष्टीने जिल्ह्यातील चार धरणे तुडुंब भरले. शुक्रवारी सकाळी १० वाजतापासून चंदई धरणातून २.५४६, ...

Heavy rains in nine talukas | नऊ तालुक्यांतील अतिवृष्टीने दाणादाण

नऊ तालुक्यांतील अतिवृष्टीने दाणादाण

googlenewsNext

बॉक्स

चार धरणांच्या सांडव्यातून पाणी विसर्ग

अतिवृष्टीने जिल्ह्यातील चार धरणे तुडुंब भरले. शुक्रवारी सकाळी १० वाजतापासून चंदई धरणातून २.५४६, लभानसराड १०.१६३, डोंगरगाव १२७ व लाल नाला धरणातून ६३. ३४ क्यूसेक पाणी सोडले जात आहे. असोलामेंढा, घोडाझरी, नलेश्वर, चारगाव, अमलनाला, पकड्डीगुडम व इरई धरणातील जलसाठ्यातही वाढ झाल्याची माहिती चंद्रपूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्याम काळे यांनी दिली.

बॉक्स

गोसेखुर्द धरणाचे ३१ दरवाजे उघडले

गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असल्याने धरण तुडुंब भरले. पाणी पातळी कायम राखण्यासाठी ३१ दरवाजातून २२५० क्यूसेक पाणी सोडले जात होते. मात्र, संभाव्य धोका लक्षात घेऊन सुरू शुक्रवारी दुपारी ३ वाजतापासून पुन्हा ४००० ते ५००० क्यूसेक्स पाणी सोडणे सुरू झाले. जिल्हा प्रशासनाने वैनगंगा नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

बॉक्स

अतिवृष्टी झालेले तालुके

जिल्ह्यात नऊ तालुक्यात अतिवृष्टी झाली. चंद्रपूर तालुक्यात ११२.८ मिमी, बल्लारपूर १९०.६, गोंडपिपरी ७७, मूल ८३.१, सावली ७३.७, सिंदेवाही ८५.७, राजुरा १४५.६, कोरपना १४०.८ आणि जिवती तालुक्यात सर्वाधिक २००.७ मिमी पावसाची नोंद झाली. या तालुक्यात पाऊस सुरूच असल्याने जनजीवन विस्कळीत झाले. शेतीची कामे ठप्प आहेत.

बाॅक्स

शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर सर्वेक्षणासाठी बैठका

संततधार पावसाचा सर्वाधिक फटका नऊ तालुक्यांना बसला. नाल्याच्या काठावर असलेली शेती पुराच्या पाण्याखाली बुडून आहे. शेतकऱ्यांनी याबाबत कृषी व महसूल अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर शुक्रवारी तालुकास्तरावर तातडीच्या बैठका घेण्यात आल्या. पुराचे पाणी उतरताच शनिवारपासून नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण केले जाणार आहे.

२४ तासांतील तालुकानिहाय पाऊस (मि.मी.मध्ये)

चंद्रपूर ११२.८

बल्लारपूर १९०. ६

गोंडपिपरी ७७

पोंभुर्णा ८३.१

मूल ११३.४

सावली ७३.७

वरोरा ६१.६

भद्रावती ६३

चिमूर ४४

ब्रह्मपुरी २६.८

सिंदेवाही ८५.१

नागभीड ४६.४

राजुरा १४५.६

कोरपना १४०.८

जिवती २००.७

एकूण १४६५.२

सरासरी ९७.७२४

Web Title: Heavy rains in nine talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.