यंदा भरपूर पाऊस, कोरोनानंतर आता पुराची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 05:00 AM2021-06-10T05:00:00+5:302021-06-10T05:00:23+5:30

जिल्ह्यात वर्धा, वैनगंगा या प्रमुख नद्यांसह इरई, झरपट आदी नद्या वाहतात. त्यामुळे नदी काठावरील गावांना दरवर्षीच धोका निर्माण होतो. विशेष म्हणजे, इरई धरण भरल्यानंतर पाणी सोडल्यास चंद्रपूर शहरासह अन्य गावांमध्येही पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे प्रशासनाने पूर्व तयारी सुरु केली असून संभाव्य पुरपरिस्थितीच्या गावांवर लक्ष केंद्रीत केले आहे. यासंदर्भात संबंधित विभागांना तशा सूचना जारी करण्यात आल्या आहे.

Heavy rains this year, flood threat after Corona | यंदा भरपूर पाऊस, कोरोनानंतर आता पुराची धास्ती

यंदा भरपूर पाऊस, कोरोनानंतर आता पुराची धास्ती

Next
ठळक मुद्देजिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुरु केली तयारी ; तालुकास्तरावरही पथकांचे केले गठन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : यावर्षी पाऊस चांगला पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे भविष्यात पुरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्व तयारी म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने बैठक तसेच विभागनिहाय सूचना जारी केल्या असून विभाग संभाव्य पुरपरिस्थितीसोबत लढण्यास सज्ज आहे.
जिल्ह्यात वर्धा, वैनगंगा या प्रमुख नद्यांसह इरई, झरपट आदी नद्या वाहतात. त्यामुळे नदी काठावरील गावांना दरवर्षीच धोका निर्माण होतो. विशेष म्हणजे, इरई धरण भरल्यानंतर पाणी सोडल्यास चंद्रपूर शहरासह अन्य गावांमध्येही पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे प्रशासनाने पूर्व तयारी सुरु केली असून संभाव्य पुरपरिस्थितीच्या गावांवर लक्ष केंद्रीत केले आहे. यासंदर्भात संबंधित विभागांना तशा सूचना जारी करण्यात आल्या आहे. पूर आल्यास कोणत्या उपाययोजना करावयाच्या यासंदर्भात आराखडाही तयार करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली असून त्यातील पोट कलम २ नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी हे या प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहे. यानुसार त्यांनी सर्व संबंधित अधिकारी तसेच विभाग प्रमुखांना मान्सूनपूर्व तयारीची सर्व कामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने तालुकास्तरावर तसेच महापालिका, नगरपरिषदांनाही सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

पूरबाधित क्षेत्र
जिल्ह्यात वर्धा, वैनगंगा या नद्यांसह इरई, झरपट या नद्या आहेत. या नद्यांतील क्षेत्रामध्ये काही गावांना पुराचा फटका बसतो. तर इरई धरणालगत असलेल्या गावांसह चंद्रपूर शहरालाही पुराचा फटका बसतो. यासोबतच राजुरा, नागभीड, ब्रह्मपुरी, बल्लारपूर, मूल, सिंदेवाही या तालुक्यातील गावांना पुराचा धोका असतो.

चंद्रपूर शहरात १०१ इमारती धोकादायक
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील इमारतींचे महापालिकेने सर्व्हेक्षण केले असून शहरातील ३ झोनमध्ये १०१ इमारती धोकादायक आहे. त्या केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात झोननिहाय उपायुक्त धनंजय सरनाईक, शीतल वाकडे, विद्या पाटील यांच्या आदेशानुसार धोकादायक इमारत मालकांना नोटीस पाठविण्यात आला आहे. पावसाळा सुरु होण्यापूर्वी या इमारती सोडण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

अग्नीशमन दलात रिक्त पदांचे ग्रहण
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, महानगरपालिका अग्णीशमन दल, तालुकानिहाय आपत्ती व्यवस्थापन विभाग, नगर पंचायती सज्ज आहे. असे असले तरी चंद्रपूर अग्नीशमनदलात रिक्त पदाचे ग्रहण आहे. अनेक पदे रिक्त असल्यामुळे येथील कारभार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. पोलीस विभाग, उपविभागीय कार्यालय तसचे तहसील कार्यालयामंध्ये विविध पथकांचे गठण करण्यात आले आले असून बचाव व साहित्य उपलब्ध करून दिले

मान्सून पूर्व तयारीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने तयारी केली आहे. तालुका, नगरपरिषद विभागांना सूचना करण्यात आल्या आहे. पोलीस तसेच विविध विभागात पथकांचेही गठन केले आहे.
-जितेश सुरवाडे, 
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, चंद्रपूर

 

Web Title: Heavy rains this year, flood threat after Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.