जड वाहतूकदारांची मनमानी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 11:13 PM2017-10-30T23:13:11+5:302017-10-30T23:13:37+5:30

कोरपना तालुका सिमेंट कारखान्यासाठी जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

Heavy transporters' arbitrariness continues | जड वाहतूकदारांची मनमानी सुरूच

जड वाहतूकदारांची मनमानी सुरूच

Next
ठळक मुद्देअनेकांचा गेला जीव : केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या आदेशाला पोलिसांकडून बगल

लोकमत न्यूज नेटवर्क
आवारपूर : कोरपना तालुका सिमेंट कारखान्यासाठी जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. कारखान्यातील जड वाहतुकीमुळे व उभ्या ट्रॅकमुळे दुचाकी व चारचाकी धारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सिमेंट कारखान्या जवळील रस्त्यावर दोन्ही बाजूला ट्रक उभे राहत असून मध्ये कुठेही रस्त्यावर वाहने उभी केली जातात. यामुळे आजपर्यंत अनेकांचा नाहक बळी गेला आहे. याची दखल घेत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी कारवाई करण्याचे वाहतूक विभागाला निर्देश दिले होते. मात्र त्यांच्या आदेशाची सर्रास अवहेलना होत आहे.
काही महिन्यांपूर्वी गडचांदूर येथील विश्रामगृहात झालेल्या बैठकीत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर अहीर पोलीस विभागला सूचना देऊन रस्त्यावर उभे असणाºया ट्रक व इतर जड वाहतुकीवर कारवाईचा बडगा उचला. त्यांचामुळे सामान्य नागरिकांचा जीव जात आहेत. कितीही पैसा मिळाला तरी एकदा गेलेला जीव परत मिळत नाही. त्यामुळे कारवाई करा, असे पोलीस विभागाला सूचना दिल्या होत्या. एवढेच नाही तर त्यांनी स्वत: रस्त्यावर उभे राहून पाहणी केली. त्यांचा आदेशानुसार दोन दिवस रस्त्यावर ट्रक उभे दिसले नाही. मात्र नंतर परिस्थिती जैसे थे झाल्याची दिसून येत आहे. यामुळे ना. अहीर यांचा आदेशाला सुद्धा पोलीस विभाग बगल देत असल्याचे दिसून येत यात सामान्यांना अडचणी येत आहेत.
ट्रान्सपोर्ट मालकांची दादागिरी
कारखान्यातील ट्रक रस्त्यावर उभे केले जातात. ट्रक व ट्रान्सपोर्ट मालकाला कसल्याही प्रकारची भीती उरलेली नाही. पोलिसांकडून थातुरमातुर कारवाई होत असल्याने आणि पोलीस विभागाला हप्ते जात असल्याने दोन दिवसांचा कारवाईला कोणीही जुमानत नसल्याचे दिसून येते.
या रस्त्यावर नेहमीच त्रास
उपरवाही-गडचांदूर, गडचांदूर-आवारपूर, गडचांदूर-भोयगाव व प्रत्येक कारखान्यातील परिसरात असलेल्या मुख्य रस्त्यावर ट्रक व जड वाहतुकीचे वाहने उभी असल्याचे निदर्शनास येते. मात्र यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.

Web Title: Heavy transporters' arbitrariness continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.