पेंढरी (गोंदेडा) परिसरातील शेतकरी हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 11:53 PM2017-11-04T23:53:53+5:302017-11-04T23:54:03+5:30
यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे या भागातील ७५ टक्के शेतकºयांचे रोवणे झालेच नाही. धान पिकांवर मावा तुरतुडा रोगांचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने पीक होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पेंढरी (कोके): यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे या भागातील ७५ टक्के शेतकºयांचे रोवणे झालेच नाही. धान पिकांवर मावा तुरतुडा रोगांचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने पीक होत आहे.
सिंदेवाही तालुक्यातील आलेसुर, नैनपूर, पेंढरी, कोकेवाडा, मुरपार व चिमुर तालुक्यातील पेठ, केवाडा, गोंदोडा, वडसी, खातोडा, महादवाउी, मोटोगाव, काजळसर, खुटाळा, खांबाडा, गोरवट, हरणी, बोथली, सिरपुर, पिपर्डा, पळसगाव, सरांडी, खांडला ई-गावात धान व हळदीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु, यावर्षी या भागात जुनच्या तिसºया आठवड्यापासून पाऊसच गायब झाला.
त्यामुळे ७५ टक्के शेतकºयांने रोवणेच केले नाही. ज्यांनी रोवणे केले त्यांचे धान पोळ्याच्या मोसमात चांगले होते. मात्र, त्यानंतर धान निसवायला लागताच मावा तुरतुडा रोगाचा प्रादूर्भाव झाला. या रोगाने धानाची पूर्णत: तणीस झाली. शेतकºयांनी लावलेला खर्चही निघण्याची शक्यता नाही.
चार एकरांत आधी ४० ते ५० पोते धान व्हायचे. ते केवळ ६ पोत्यांवर येण्याचा धोका दिसून येत आहे. धानाला उतारी आल्याने शेतकºयांना स्वत:कडून पैसे भरून द्यावे लागत आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडून कर्जबाजारी होत आहेत. त्यामुळे शासनाने सर्वेक्षण करून करून शेतकºयांना एकरी ३० हजार रूपये द्यावी, अशी मागणी सिंदेवाही तालुक्यातील शेतकरी करत आहेत.
यावर्षी २५ टक्के शेतकºयांनी रोवणे केले. मात्र, मावा तुरतुडा आदी रोगाने धानाला पूर्ण नष्ट केले. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने सर्वेक्षण करून आर्थिक मदत द्यावी.
- चंद्रकांत ल.शिंदे
शेतकरी तथा माजी सरपंच पेंढरी (कोके)