निर्बंधामुळे उत्पन्नावर टाच, आदिवासींची आर्थिक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:29 AM2021-05-11T04:29:01+5:302021-05-11T04:29:01+5:30
सध्या कोरोना प्रकोपात अनुसूचित जमाती, आदिवासी लोकांना रोजगाराच्या कोणत्याही प्रकाराच्या संधी उपलब्ध नाहीत. आदिवासी समाजातील आदिम जमातीमधील अनेक कुटुंबे ...
सध्या कोरोना प्रकोपात अनुसूचित जमाती, आदिवासी लोकांना रोजगाराच्या कोणत्याही प्रकाराच्या संधी उपलब्ध नाहीत. आदिवासी समाजातील आदिम जमातीमधील अनेक कुटुंबे दारिद्र्य रेषेखालील आहेत. त्यांना मजुरीशिवाय उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. राज्य शासनाने दुसरा लॉकडाऊन जाहीर केल्यानंतरही अजूनपर्यंत खावटी अनुदान व किराणा साहित्याचे वाटप सुरू केले नाही. त्यामुळे खावटी कर्ज तातडीने वाटप सुरू करण्याची मागणी चंद्रपूर जिल्हा शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप, प्रभाकर दिवे, अरुण नवले, ज्योत्स्ना मोहितकर, पौर्णिमा निरांजने, ॲड. श्रीनिवास मुसळे, नीळकंठ कोरांगे,तुकेश वानोडे, प्रा. नीलकंठ गौरकर, डॉ. संजय लोहे,ॲड.शरद कारेकर,सुधीर सातपुते, प्रा. रामभाऊ पारखी, रघुनाथराव सहारे, दादा नवलाखे आदींनी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे केली आहे.