हैदोस घालणारा ‘तो’ बिबट जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 11:39 PM2018-12-09T23:39:50+5:302018-12-09T23:40:15+5:30

मागील एक महिन्यापासून कोठारीत हैदास घालून चार जणांवर हल्ला करून जखमी करणाºया बिबटाला रविवारी पहाटे ४ वाजताच्या दरम्यान वनविभागाने पिंजऱ्यात जेरबंद केले.

Heidos 'he' spoiled beats | हैदोस घालणारा ‘तो’ बिबट जेरबंद

हैदोस घालणारा ‘तो’ बिबट जेरबंद

googlenewsNext
ठळक मुद्देकोठारी परिसरातील प्रकार : गावकऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठारी : मागील एक महिन्यापासून कोठारीत हैदास घालून चार जणांवर हल्ला करून जखमी करणाºया बिबटाला रविवारी पहाटे ४ वाजताच्या दरम्यान वनविभागाने पिंजऱ्यात जेरबंद केले.
कोठारी येथील आनंदनगर व फुक्कटनगर येथील शौचास जाणाऱ्या गावकऱ्यांवर बिबट्याने हल्ला होता. यात तीन जण गंभीर जखमी झाले होते. आनंदनगर येथे रात्री घरात प्रवेश करून पाच वर्षीय मुलीवरही बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते. यामुळे गावकऱ्यांमध्ये भीती व वनविभागाप्रति तीव्र संताप उमटला होता. गावात हैदोस घालणाऱ्या बिबटाला पकडून जेरबंद करण्याची मागणी सर्वस्तरातून होत होती. कोठारीचे सरपंच मोरेश्वर लोहे यांनी कोठारीतील वनकार्यालयास टाळे ठोकून बिबटाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी १५ टॅप कॅमेरे व दोन पिंजरे बसविले होते. रात्रंदिवस वन कर्मचाऱ्यांची गस्ती सुरू होती. मात्र बिबट पिंजऱ्याजवळ फिरकला नाही. मात्र बिबट्याच्या कारवाया दिवसेंदिवस वाढतच होत्या. त्यामुळे गावकऱ्यांत प्रचंड भीतीचे, दहशतीचे वातावरण पसरले होते. नागरिकांची वनविभागाची झोप उडाली होती. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन्यजीव अधिकाऱ्यांकडून परवानगीच मिळाली नसल्याने वनअधिकारी हतबल झाले होते व गावकऱ्यांच्या रोषाला समोर जावे लागत होते.
अखेर ७ डिसेंबरला वन्यजीव अधिकारी नागपूर यांनी बिबट्याला जेरबंद करण्याची रितसर परवानगी दिली व रविवारी पहाटे ४ वाजता जेरबंद करण्यात वनकर्मचाऱ्यांना यश आले. बिबट्याला झरण येथील रोपवाटिकेत ठेवण्यात आले. मध्य चांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, सहाय्यक वनसंरक्षक प्रविण मोरे, वन्यजीवचे निखील तांबे, प्रविण ठाकूर यांनी रोपवाटिकेत भेट देवून पाहणी केली.

कोठारीत हैदोस घालणारा बिबट जेरबंद केला असून तो एक ते दीड वर्षाचा आहे. त्याला शिकारीचा अनुभव नसल्याने गावकऱ्यांवर हल्ला करून नखाने ओरबडत होता. त्याला जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे.
-गजेंद्र हिरे
उपवनसंरक्षक मध्य चांदा
वनविभाग, चंद्रपूर

Web Title: Heidos 'he' spoiled beats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.