वारसदारांना अनुकंपा तत्त्वावर नोकरीत घ्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:28 AM2021-05-19T04:28:54+5:302021-05-19T04:28:54+5:30

चंद्रपूर : कोरोना महामारी संकटात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा कर्तव्य बजावत असताना कोविडमुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसदारांना ५० लाखष ...

Heirs should be hired on compassionate grounds | वारसदारांना अनुकंपा तत्त्वावर नोकरीत घ्यावे

वारसदारांना अनुकंपा तत्त्वावर नोकरीत घ्यावे

Next

चंद्रपूर : कोरोना महामारी संकटात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा कर्तव्य बजावत असताना कोविडमुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसदारांना ५० लाखष सानुग्रह सहाय देण्यात यावे, तसेच अनुकंपा तत्त्वावर कुटुंबातील वारसदारांना नोकरीत सामावून घेण्याची मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी केली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.

कोविड-१९ संबंधित कर्तव्य बजावताना दुर्दैवाने मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५० लाख सानुग्रह सहाय लागू करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. त्याला २० जूनपर्यंत मुदतवाढ सुद्धा देण्यात आली आहे. संपूर्ण राज्यामध्ये कोविड-१९ च्या नियंत्रणासाठी शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सेवा अधिग्रहित करण्यात आली आहे. अनेक शिक्षकांचा कोविडची बाधा होऊन मृत्यू झाला आहे. त्यामुळे कुटुंबातील आधार गेल्याने मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. अशा सर्व शिक्षक व कर्मचारी कुटुंबातील वारसदारांना ५० लाख सानुग्रह अनुदान लागू करण्यात यावे व त्यांच्या वारसदारांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात यावी. अंशदान निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू असणाऱ्या शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविडमुळे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना अल्प प्रमाणात निवृत्तीचे लाभ मिळत असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी येत आहे. त्यामुळे कार्यरत कोणत्याही शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा कोविड-१९ मुळे मृत्यू झाल्यास त्यांना सरसकट रक्कम ५० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय मंजूर करण्यात यावे, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

Web Title: Heirs should be hired on compassionate grounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.