चंद्रपुरात पुन्हा हेल्मेटसक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 12:14 AM2018-12-07T00:14:16+5:302018-12-07T00:15:01+5:30

रस्ता सुरक्षेच्या नावाखाली नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता कधीही हेल्मेटसक्ती करण्याचा प्रकार या आधी झाला असून आता पुन्हा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या दबावामुळे बुधवारपासून चंद्रपुरात हेल्मेट सक्ती सुरू करण्यात आली आहे.

Helmets again in Chandrapur | चंद्रपुरात पुन्हा हेल्मेटसक्ती

चंद्रपुरात पुन्हा हेल्मेटसक्ती

googlenewsNext
ठळक मुद्देनागरिकांमध्ये संताप : वाहन अडवून ठोठावला जातोय दंड

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : रस्ता सुरक्षेच्या नावाखाली नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता कधीही हेल्मेटसक्ती करण्याचा प्रकार या आधी झाला असून आता पुन्हा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या दबावामुळे बुधवारपासून चंद्रपुरात हेल्मेट सक्ती सुरू करण्यात आली आहे. शहर वाहतूक शाखा ते बंगाली कॅम्पकडे जाणाºया राष्ट्रीय महामार्गावरील सावरकर चौकात वाहतूक पोलिसांनी दुचाकी चालकांना अडवून हेल्मेट नसलेल्या वाहनधारकांना थेट दंड ठोठावणे सुरू केले. त्यामुळे नागरिकांमध्ये तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या आधी चार महिन्यांपूर्वी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी एका रात्री हेल्मेट सक्तीचा आदेश काढला. त्यामुळे दुचाकी वाहनचालकांची प्रचंड तारांबळ झाली. दंड ठोठावला जात असल्याने ठिकठिकाणी हेल्मेट विक्री करणाºयांचे स्टॉल लागले. मात्र नागरिकांकडून टिकेची झोड उठताच हेल्मेट सक्ती गुंडाळण्यात आली. त्याच दरम्यान नियती ठाकर यांची बदली झाल्यामुळे हेल्मेट सक्तीला अल्पविराम मिळाला होता. आता पुन्हा चंद्रपूर येथील पोलीस विभागाकडून हेल्मेट सक्ती केली जात आहे. सुत्राने दिलेल्या माहितीनुसार रस्ते अपघातांचा अभ्यास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीच्या नेतृत्वात समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या अभ्यासात रस्ते अपघातात महाराष्ट्र अग्रेसर असल्याची गंभीर बाब निदर्शनास आली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने राज्याच्या मुख्य सचिवांना फटकारले. परिणामी मुख्य सचिवांनी अल्पावधीत रस्ते अपघात कमी करण्यावर धोरण निश्चित केले जाईल, असे शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले. सर्वाधिक रस्ते अपघात हे दुचाकी चालकांचे होतात. हेल्मेटअभावी अपघातामुळे दुचाकी चालकांचा मृत्यू होत असल्याची बाब या अभ्यासात निदर्शनास आली होती. त्यामुळे राज्याच्या मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे रस्ते अपघात नियंत्रणात आणण्याचे आदेश दिले. गेल्या महिन्यात रस्ते अपघात नियंत्रणात आणण्याचे आदेश मिळताच आता पोलीस आणि परिवहन विभाग सक्रीय झाला आहे. त्यामुळे नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता हेल्मेट सक्ती सुरू करण्यात आली आहे. महानगरपालिका क्षेत्रात हेल्मेट सक्ती करण्यात येवू नये, असे सुरुवातीला आदेश होते. आता मात्र, हा आदेश उठविण्यात आला आहे. हेल्मेट सक्ती वाहनचालकाच्या हिताची असली तरी याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती न करता आणि पूर्वसूचना न देता थेट दंड ठोठावला जात असल्यामुळे वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भात वाहतूक निरीक्षक विलास चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हेल्मेट सक्ती कधीच बंद नव्हती. यापूर्वी बाहेरगावावरून शहरात येणाºयांवर कारवाई सुरूच होती. आता शहरातही हेल्मेटसंदर्भात दंडात्मक कारवाई केली जात आहे.

Web Title: Helmets again in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.