रानडुकराच्या हल्ल्यात मृत झालेल्या कुटुंबियांना मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:53 AM2021-03-04T04:53:13+5:302021-03-04T04:53:13+5:30
शंकरपूर : जंगली डुकराच्या धडकेमुळे शंकरपूरजवळील गडपिपरी येथील रमेश भिवाजी पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. येरखेडा येथील आशा दिघोरे ...
शंकरपूर : जंगली डुकराच्या धडकेमुळे शंकरपूरजवळील गडपिपरी येथील रमेश भिवाजी पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. येरखेडा येथील आशा दिघोरे यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यासंदर्भात रमेश पाटील व आशा दिघोरे या दोघांच्याही कुटुंबियांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आंबोलीचे ग्रामपंचायत सदस्य व सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे चिमुर तालुकाध्यक्ष शुभम मंडपे यांनी केली आहे.
या दोघांच्याही मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांवर आभाळ कोसळले आहे. त्यांच्यासमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिवाराची सांत्वना करण्यासाठी शासनाच्या योजनेनुसार त्यांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशा मागणीचे निवेदन भिसी येथील वन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. हे निवेदन आंबोली ग्रामपंचायतीचे सदस्य व सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे चिमुर तालुकाध्यक्ष शुभम मंडपे व सामाजिक कार्यकर्ते मनोज सरदार, मधुकर नागपुरे, दिनेश भषारकर, तलाशकुमार खोब्रागडे, राजकुमार पाटील, सुरेश गरमळे, प्रकाश मेश्राम, राजेंद्र जाधव, कुशाब डोये, बंडू दिघोरे, सुनील भीमटे आदींनी दिले.