वीज मनोरे उभारताना शेतकऱ्यांना लाभ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 10:53 PM2018-07-23T22:53:44+5:302018-07-23T22:54:00+5:30
भारतीय विद्युत अधिनियम २००३ च्या कलम १६४ तसेच टेलीग्राम अधिनियम १८८५ कलम १० (ड) अनुसार व महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये महापारेषण कंपनीच्या पारेषण वाहिन्या व मनोºयाचे उभारणी संदर्भात विशेष अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित व्यक्तीला नुकसानीबद्दल पूर्ण नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भारतीय विद्युत अधिनियम २००३ च्या कलम १६४ तसेच टेलीग्राम अधिनियम १८८५ कलम १० (ड) अनुसार व महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये महापारेषण कंपनीच्या पारेषण वाहिन्या व मनोºयाचे उभारणी संदर्भात विशेष अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित व्यक्तीला नुकसानीबद्दल पूर्ण नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. परंतु अधिसूचना ही त्रुटीपूर्ण व नुकसानग्रस्तांसाठी अन्यायकारक आहे, याकडे आ. बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांचे लक्ष वेधले.
नुकसानग्रस्त शेतकºयांवरील अन्याय टाळण्यासाठी वीज मनोरे उभारताना शेतकºयांना लाभ द्यावा, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत करून विविध सुधारणा सुचविल्या.
मनोरे उभारतांना अधिग्रहीत करण्यात येणारी जमीन ही मूळ पायासकट मोजणी करावी, त्याचा मोबदला हा मुख्य नोंदणी महानिरीक्षकाच्या नियमाप्रमाणे संभाव्य अकृषक वाणिज्य दरानुसार देण्यात यावा, मनोरे उभारताना व त्यानंतर २५ वर्र्षांपर्यंत देखभालसाठी वापरात असलेल्या शेतकºयांच्या जमिनीचा जो वापर जमिनी करतील त्याचा मोबदल्याविषयी अधिनियमात समावेश करावा, शेतातून जी विद्युत वाहिनी टाकण्यात येणार आहे. त्याची पाहणी परिसर (लाईन कॉरीडोअर) च्या मापदंडानुसार निर्धारीत करावी, त्याप्रमाणे नुकसान भरपाई ही मुख्य महानिरीक्षक यांच्या संभाव्य अकृषण वाणिज्य वापराच्या दराने देण्यात यावी, सध्याची प्रस्तावित १५ टक्के जमिनीमध्ये वाढ करून ती कॉरीडोअर क्षेत्राला लागू करण्यात यावी.
प्रस्तावित मनोऱ्यांमध्ये कंपनीमार्फत काही बदल झाल्यास नुकसानग्रस्त शेतकºयांच्या शेतामध्ये कंपनीतर्फे काही सिव्हिल काम केल्यास शेतकऱ्यांच्या नुकसानी संदर्भात अस्तित्वात असलेल्या नियमामध्ये काही तरतूद नाही त्यामुळे शेतकरी हा भरपाईपासून वंचित राहतो. अशा शेतकऱ्यांच्या बाबतीत या नियमात नुकसान भरपाईची तरतूद करावी, या सुधारणांवर चर्चा केली.
बैठकीला शेतकरी प्रतिनिधी म्हणून सचिन सोनटक्के, राजू गोखरे, सुनील गोखरे, संदीप लोहे, शेंडे, वर्भे, शिवसेना पदाधिकारी प्रमोद मगरे, राजू महाजन, बाळू चिंचोलकर, प्रवीण काकडे, भोजराज झाडे, प्रफुल्ल पुलगमकर आदी उपस्थित होते.