गोवरमुक्त करण्यासाठी सहकार्य करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 11:06 PM2018-09-07T23:06:10+5:302018-09-07T23:06:30+5:30
२०२० पर्यंत गोवर या आजाराचे निर्मूलन व रुबेला या आजाराचे नियंत्रण करण्याचे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे. यासाठी शाळांमधील व शाळेबाहेरील मुलांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणे गरजेचे असून याकरिता शिक्षक व पालकांचे सहकार्य आवश्यक आहे. १०० टक्के लसीकरण करून आपले शहर गोवर व रुबेलामुक्त करण्यासाठी चंद्रपूरकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर अंजली घोटेकर व स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : २०२० पर्यंत गोवर या आजाराचे निर्मूलन व रुबेला या आजाराचे नियंत्रण करण्याचे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे. यासाठी शाळांमधील व शाळेबाहेरील मुलांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणे गरजेचे असून याकरिता शिक्षक व पालकांचे सहकार्य आवश्यक आहे. १०० टक्के लसीकरण करून आपले शहर गोवर व रुबेलामुक्त करण्यासाठी चंद्रपूरकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर अंजली घोटेकर व स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांनी केले आहे.
मनपाच्या आरोग्य विभागातर्फे महानगरपालिका शाळा, जिल्हा परिषद शाळा, खाजगी शाळा तसेच शहरातील डॉक्टर्स यांच्याकरिता विविध कार्यशाळा नुकतीच पार पडली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना महापौर घोटेकर म्हणाल्या, सदर मोहीम पाच आठवड्याच्या कालावधीत जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये पहिल्या दोन आठवड्यात लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे. याकरिता शिक्षक व पालकांनी समन्वय साधून आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी व सुदृढ आरोग्याकरिता लसीकरण महत्वाचे आहे. दिवसेंदिवस लसीकरणाचे महत्त्व सगळ्यांना कळत असल्याने ही मोहीम यशस्वी होत आहे. असे त्या म्हणाल्या. यावेळी स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे म्हणाले, गोवर व रुबेला ही लस ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना द्यावयाची असल्याने यात पालकांचा सहभाग महत्त्वाचा असणार आहे, असे ते म्हणाले.
यावेळी उपायुक्त गोस्वामी, नीत, डॉ. मेश्राम, डॉ. मोहम्मद साजिद, डॉ. जयश्री वाडे, डॉ. विजया खेरा, डॉ. अश्विनी भारत आदी उपस्थित होते.