वाहतूक पोलिसांसाठी मदतीचा हात

By admin | Published: May 4, 2017 12:44 AM2017-05-04T00:44:07+5:302017-05-04T00:44:07+5:30

महाराष्ट्र दिनानिमित्त फ्रेड्स फॉर एव्हर क्लबच्या माध्यमातून वाढते तापमान पाहता उन्हामध्ये अहोरात्र झटणाऱ्या....

Help hand in traffic police | वाहतूक पोलिसांसाठी मदतीचा हात

वाहतूक पोलिसांसाठी मदतीचा हात

Next

फेंड्स फॉर एव्हर क्लब : ओआरएस आणि मिनरल वॉटरचे वितरण
चंद्रपूर : महाराष्ट्र दिनानिमित्त फ्रेड्स फॉर एव्हर क्लबच्या माध्यमातून वाढते तापमान पाहता उन्हामध्ये अहोरात्र झटणाऱ्या सर्व वाहतूक पोलिसांना ओआरएस आणि मिनरल वॉटरच्या बॉटलचे वाटप करुन शहरात वाहतूक पोलिसांना मदतीचा हात देण्यात आला.
शासकीय सुट्टीच्या दिवशी जेव्हा सर्व शहरवासी सुट्टीचा आनंद घेत असतात, तेव्हा रखरखत्या उन्हात वाहतूक पोेलीस आपली सेवा चोख पणे बजावत असतात. शहर वासीयांना कोणताही वाहतूकीचा त्रास होऊ नये म्हणून वाहतूकीदरम्यानची गुंता-गुंत सोडवण्याचे महत्वाचे कार्य करीत असतात. वाहतुकीदरम्यान होणाऱ्या सर्व घटनावर ते लक्ष ठेऊन असतात. त्यावेळी ते आपल्या जिवाची पर्वासुद्धा न करता, ते आपले कर्तव्य निष्ठापूर्वक बजावित असतात. अशा वाहतूक पोलिसांना फ्रेडस फॉर ऐव्हर क्लबने सदर उपक्रमातून त्याच्या कार्याला सलाम करीत आहे. त्यामुळे त्यांचे शहरवासीयांकडून कौतूक करण्यात येत आहे.
सदर उपक्रमात फेंड्स फॉर ऐव्हर क्लबतर्फे सर्व वाहतूक पोलिसांना ओआरएस आणि मिनरल वॉटर बॉटलचे त्याठिकाणी जाऊन त्यांना वितरण करण्यात आले. यावेळी फ्रेडस फॉर ऐव्हर क्लबचे अ‍ॅड. आशिष मुंधडा, वैभव खांडरे, द्वीपेंद्र पारख, साजिद माजिद, अभिनव बांगडे, महेश गड्डम आदी उपस्थित होते.
यावेळी वाहतूक नियंत्रक विभागाचे वाहतूक पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी फ्रेन्ड फॉर ऐव्हर क्लबच्या कार्याचे गौैरव केला असून आमच्या प्रती असे सहकार्य केल्याबाबत त्यांनी क्लबचे आभारही मानले आहे. संघटनेने घेतले पाऊल हे आमच्यासाठी अभिमानाचे असल्याचेही त्यांनी बोलून दाखविले आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Help hand in traffic police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.