पोलिसांच्या आशीर्वादाने तळोधीत अवैध धंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 11:28 PM2017-09-24T23:28:12+5:302017-09-24T23:28:23+5:30

साईनगरी अप्पर तालुक्यातील तळोधी(बा) पोलीस ठाण्यांतर्गत अनेक गावात मोठ्या प्रमाणात सट्टापट्टी, अवैध दारू व अवैध वाहतूक सुरू आहे.

With the help of police, illegal activities in the locked | पोलिसांच्या आशीर्वादाने तळोधीत अवैध धंदे

पोलिसांच्या आशीर्वादाने तळोधीत अवैध धंदे

Next
ठळक मुद्देसट्टापट्टी, अवैध दारू व अवैध वाहतूक सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोधी (बा) : साईनगरी अप्पर तालुक्यातील तळोधी(बा) पोलीस ठाण्यांतर्गत अनेक गावात मोठ्या प्रमाणात सट्टापट्टी, अवैध दारू व अवैध वाहतूक सुरू आहे. मात्र याकडे येथील पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे यावर अंकुश केव्हा बसणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अवैध व्यवसायधारकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
या पोलीस ठाण्यांतर्गत ४२ गावांचा कारभार चालतो. या अगोदर तळोधी(बा) येथे एक पोलीस चौकी होती. त्याठिकाणी एक वरिष्ठ अधिकारी व चार पोलीस कॉन्स्टेबल होते. मात्र यापूर्वी पोलीस चौकीला पोलीस उपनिरीक्षक अनिल गुजर, मोहितकर यांनी चांगला कार्यभार सांभाळला होता. त्यांनी अवैध धंद्यांवर आळा बसवून गाव शांत ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शासनाने चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केल्याला जवळपास दोन वर्षे पूर्ण होत आहे, तरीसुद्धा अनेक गावामध्ये अवैध दारू तस्करी व विक्रीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा मोठा बिकट प्रश्न निर्माण झालेला आहे.
या ठिकाणी तळोधी(बा), बालापूर, नांदेड, गिरगाव, गोविंदपूर, सावरगाव, वाढोणा, कन्हाळगाव, कच्चेपार या ठिकाणी अवैध दारू विक्रेत्याकडून मागेल त्याला दारू दिली जात आहे. चौका-चौकात अवैध दारू विक्री सुरू आहे. दारू तस्कर व पोलिसांचे मधुर संबंध असल्यामुळे कारवाई करीत असताना मोठ्या दारू विक्रेत्यांवर कारवाई न करता लहान दारू विक्रेत्यांवर कारवाई करून केसेस वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी तळोधी(बा) पोलीस स्टेशनअंतर्गत होत असलेल्या अवैध धंद्यावर अंकुश घालावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title: With the help of police, illegal activities in the locked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.