मदत वाऱ्यावरच; रिक्षाचालकांना दीड हजार रुपये कधी मिळणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:27 AM2021-05-10T04:27:37+5:302021-05-10T04:27:37+5:30
----- बॉक्स अनेकांनी बदलविला व्यवसाय लॉकडाऊनमुळे बस, ट्रेन असा सर्वच प्रवास बंद आहे. तसेच घराबाहेर पडणाऱ्यावर निर्बंध आहे. त्यामुळे ...
-----
बॉक्स
अनेकांनी बदलविला व्यवसाय
लॉकडाऊनमुळे बस, ट्रेन असा सर्वच प्रवास बंद आहे. तसेच घराबाहेर पडणाऱ्यावर निर्बंध आहे. त्यामुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय बंद आहे. परिणामी त्यांना आर्थिक संटकांचा सामना करावा लागत आहे. अनेकांनी हा व्यवसाय सोडून इतर व्यवसाय सुरू केला आहे. काही जण भाजीपाला विकत आहेत. तर काही जण रोजंदारीने कामाला जात आहे.
------
शासनाने मदत देण्याची घोषणा केली. मात्र अद्यापही मदत देण्यात आली नाही. व्यवसाय बंद असल्याने रिक्षाचालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांनी तर आपला व्यवसाय बंद करून इतर काम करीत आहेत. त्यामुळे त्वरित मदत देण्यात यावी.
-राजेंद्र खांडेकर, अध्यक्ष महाराष्ट्र ॲटोरिक्षा चालक-मालक संघटना, चंद्रपूर
-----
कोट
विहित परवानाधारक रिक्षाची माहिती संकलित करून ऑनलाईन परमिट करण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात आहे. आदेश येताच ती माहिती सादर करण्यात येणार आहे. शासनाकडून निधी आल्यानंतर तो पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात येईल. - किरण मोरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी