हत्तीरोगाचा विळखा

By admin | Published: May 22, 2014 01:02 AM2014-05-22T01:02:25+5:302014-05-22T01:02:25+5:30

जिल्ह्यासह राज्यभरात दरवर्षी १0 ते १४ फेब्रुवारी दरम्यान हत्तीरोग प्रतिबंधक मोहीम राबविल्या जाते.

Heterotrophs | हत्तीरोगाचा विळखा

हत्तीरोगाचा विळखा

Next

गडचिरोली : जिल्ह्यासह राज्यभरात दरवर्षी १0 ते १४ फेब्रुवारी दरम्यान हत्तीरोग प्रतिबंधक मोहीम राबविल्या जाते. दरम्यान आरोग्य विभागाच्यावतीने डीईसी गोळ्या वितरीत केल्या जातात. मात्र दरवर्षी तपासणीदरम्यान नवीन हत्तीरोग रूग्णांची भर पडत असल्याने या रूग्णांचा आकडा फुगला आहे. सध्यास्थितीत जिल्हाभरात ४ हजार ५६८ रूग्ण हत्तीरोगाने ग्रस्त आहेत.

सन २0१२ मध्ये अंडवृद्धी व हत्तीपायाचे मिळून जिल्ह्यात एकूण ८ हजार ९१0 रूग्ण होते. यात अंडवृद्धीचे ४ हजार २२४ तर हत्तीरोगाचे ४ हजार ६८६ रूग्ण होते. राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा हिवताप कार्यालय गडचिरोलीच्यावतीने १६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २0१३ दरम्यान हत्तीरोग रूग्ण शोध मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान अंडवृद्धीचे नवीन २७३ आणि हत्तीपाय असलेले १७७ नवीन रूग्ण आढळून आले. नुकत्याच करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणामध्ये जुने व नवीन मिळून अंडवृद्धीचे जिल्ह्यात एकूण ४ हजार १३२ आणि हत्तीरोगाचे ४ हजार ५६८ रूग्ण आढळून आले आहे. रूग्णांचा आकडा मोठा असल्याने जिल्हा हत्तीरोगाच्या विळख्यात सापडला आहे.

२0१४ च्या फेब्रुवारी महिन्यात राबविण्यात आलेल्या हत्तीरोग प्रतिबंधक मोहिमेदरम्यान एकूण लोकसंख्येच्या ९३ टक्के नागरिकांना डीईसी गोळ्या वाटण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. २0११ च्या जनगणेनुसार जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १२ लाख ९ हजार ४९६ आहे. यापैकी ३ टक्के गरोधर माता, २.५ टक्के बालके, १.५ टक्के गंभीर आजारी अशा एकूण ७ टक्के लोकसंख्येला वगळून अन्य ९३ टक्के लोकसंख्येला डीईसी गोळ्या वाटण्याचे उद्दिष्ट जिल्हा हिवताप कार्यालयाने ठेवले होते. ११ लाख २४ हजार ८३१ नागरिकांना गोळ्या वाटण्याचे उद्दिष्ट होते. यापैकी १0 लाख ७ हजार ५७९ नागरिकांना प्रत्यक्षात डीईसी गोळ्या वाटण्यात आल्या. १ लाख १६ हजार २८२ नागरिक डीईसी गोळ्यांपासून वंचित राहिले.

प्रतिबंधक मोहिमेदरम्यान अनेक नागरिक कामासाठी बाहेरगावी गेले होते. तसेच आरोग्य कर्मचार्‍यांच्या भेटीच्या वेळी घर बंद असल्यामुळे या नागरिकांना गोळ्या देता आल्या नसल्याचे कार्यालयाच्या सुत्रांनी सांगितले आहे. हत्तीरोगाच्या निर्मुलनासाठी जनजागृती अत्यावश्यक आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Heterotrophs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.