कोरोना संसर्गाचा जिल्ह्यात उच्चांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 05:00 AM2020-08-06T05:00:00+5:302020-08-06T05:00:50+5:30
आजच्या बाधितामध्ये चंद्रपूर शहर व लगतचा परिसर मिळून २३, बल्लारपूर शहर व विसापूर गाव मिळून एकूण ८, भद्रावती ७, वरोरा ५, राजुरा २ , कोरपना २, ब्रह्मपुरी ४, नागभीड ५ व नागपूर जिल्ह्याचा रहिवासी असणारा एक असे एकूण ५७ बाधित पुढे आले आहेत. जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्गाचा विळखा सातत्याने वाढत चालला आहे. कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्यांना कोरोनाची लागण होऊ लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आधी मनपाचे झोन कार्यालय, त्यानंतर जिल्हा परिषद, मग जिल्हाधिकारी कार्यालय आणि आता महानगरपालिकेतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मनपाचे उपायुक्त वाघ यांचा स्वीय सहायक कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून गांधी चौकातील महानगरपालिकेची इमारत सील केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात बुधवारी कोरोना संसर्गाने उच्चांक गाठला. एकाच दिवसात जिल्ह्यात नव्या ५७ रुग्णांची नोंद झाली आहे.
त्यामुळे आता रुग्णांची एकूण संख्या ६८२ झाली आहे. यातील ४०६ बाधितांना कोरोनामुक्त करून सुटी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात आता अॅक्टीव्ह रुग्णसंख्या २७६ झाली आहे.
आजच्या बाधितामध्ये चंद्रपूर शहर व लगतचा परिसर मिळून २३, बल्लारपूर शहर व विसापूर गाव मिळून एकूण ८, भद्रावती ७, वरोरा ५, राजुरा २ , कोरपना २, ब्रह्मपुरी ४, नागभीड ५ व नागपूर जिल्ह्याचा रहिवासी असणारा एक असे एकूण ५७ बाधित पुढे आले आहेत.
जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्गाचा विळखा सातत्याने वाढत चालला आहे. कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्यांना कोरोनाची लागण होऊ लागली आहे. पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर मनपाच्या झोन कार्यालयातील कर विभागात कार्यरत एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे जटपुरा वॉर्डातील हे झोन कार्यालय सील करण्यात आले होते.
दरम्यान, ब्रह्मपुरी येथून एक सहाय्यक प्रशासन अधिकारी येथील जिल्हा परिषदेत काही कामानिमित्त आले. हे अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकारामुळे संसर्ग टाळण्यासाठी ३१ जुलै रोजी संपूर्ण जिल्हा परिषद इमारत सील करण्यात आली. ब्रह्मपुरी येथे कार्यरत या सहायक प्रशासन अधिकाऱ्यांचे कुटुंब नागपूरला राहते. एप्रिल महिन्यात ते रजा घेऊन नागपूरला कुटुंबाकडे गेले होते. दरम्यान, २४ जुलै रोजी जिल्हा परिषदेत सहायक प्रशासन अधिकाऱ्यांची बदली प्रक्रिया राबविण्यात आली होती. या बदली प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ते नागपूरवरून सरळ जिल्हा परिषदेत आले. तिथे ते अनेकांच्या संपर्कात आले. २८ रोजी त्यांचा स्वॅब घेण्यात आला. गुरुवारी रात्री तो पॉझिटिव्ह निघाला. त्यानंतर जिल्हा परिषद सील करून पॉझिटिव्हच्या संपर्कातील आठ लोकांचे स्वॅब घेण्यात आले. मात्र हे सर्वांचे स्वॅब निगटिव्ह निघाले. मात्र खबरदारी म्हणून संपूर्ण जिल्हा परिषद सॅनिटाईझ करण्यात आली होती.
त्यानंतर १ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील आस्थापना विभागातील तीन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्याच्या संपर्कातील ७० कर्मचाºयांचे नमुने घेण्यात आले. या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव कसा झाला, याचा शोध अद्यापही लागलेला नाही. दरम्यान, बुधवारी मनपाकार्यालयातील उपायुक्तांच्या स्वीय सहायकाचा स्वॅब पॉझिटिव्ह आला आहे. मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी खबरदारी म्हणून मनपा कार्यालय तत्काळ सील केले आहे. कार्यालयात कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांची अॅन्टिजन चाचणी करण्यात येत आहे. गुरुवारी पुन्हा मनपा कार्यालय सुरू होईल, असे मोहिते यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील आणखी एक पॉझिटिव्ह
जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाले होते. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील ७० कर्मचाºयांचे स्वॅब घेण्यात आले होते. यातील आणखी एका कर्मचाऱ्याचा स्वॅब पॉझिटिव्ह आला. उर्वरित ६९ कर्मचारी निगेटिव्ह निघाले होते.
अखेर ‘त्या’ अधिकाºयाविरूद्ध गुन्हा
चंद्रपूर : बाहेरून प्रवास करून जिल्हा परिषदेतील बदली प्रक्रियेत सहभागी होवून आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी ब्रह्मपुरी पंचायत समितीच्या सहाय्यक प्रशासन अधिकाऱ्यांविरूद्ध सोमवारी चंद्रपुरातील रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो अधिकारी २४ जुलैला जिल्हा परिषदेत आल्यानंतर काही विभागात फिरल्यामुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली होती. खबरदारी म्हणून प्रशासनाने चार दिवस जिल्हा परिषद सील केले होते. बदली प्रक्रियेत सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोविड १९ ची तपासणी करून प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले