आवास योजनेत चंद्रपूर महाराष्ट्रात अव्वल ठरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 10:46 PM2019-02-13T22:46:25+5:302019-02-13T22:46:59+5:30

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या विविध योजनेतून सर्वाधिक घरे जनतेला मिळेल, यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्याची गरज आहे. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांनी या योजनेच्या अंमलबजावणी व पाठपुराव्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी, कोणत्याही परिस्थितीत आवास योजनेमध्ये चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक घरे बांधणारा जिल्हा झाला पाहिजे, यासाठी कामाला लागावे, असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

The highest resolution in Chandrapur Maharashtra in the housing scheme of Chandrapur | आवास योजनेत चंद्रपूर महाराष्ट्रात अव्वल ठरावा

आवास योजनेत चंद्रपूर महाराष्ट्रात अव्वल ठरावा

googlenewsNext
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : २१ विभागांचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या विविध योजनेतून सर्वाधिक घरे जनतेला मिळेल, यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्याची गरज आहे. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांनी या योजनेच्या अंमलबजावणी व पाठपुराव्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी, कोणत्याही परिस्थितीत आवास योजनेमध्ये चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक घरे बांधणारा जिल्हा झाला पाहिजे, यासाठी कामाला लागावे, असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये पालकमंत्री यांच्या नेतृत्वात २१ विविध विभागांवर बुधवारी चर्चा करण्यात आली. दुपारी १२ वाजता या चर्चेला सुरुवात करण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) या योजनेवर प्रामुख्याने चर्चा झाली. या बैठकीत बोलताना ना. मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील शहरे उत्तमरित्या पुढील काळात उभी राहावीत, यासाठी या आवास योजनेचा कल्पकतेने विचार करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
या बैठकीला आमदार नाना श्यामकुळे, आ. अ‍ॅड. संजय धोटे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मनपा आयुक्त संजय काकडे, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी योगेश कुंभेजकर, स्थाई समितीचे सभापती राहुल पावडे, समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
सकाळच्या सत्रात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) याबाबत आढावा घेताना त्यांनी आमदार नाना श्यामकुळे, महापौर अंजली घोटेकर, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे व मनपा आयुक्त संजय काकडे यांच्याशी चर्चा केली. शहरात मोठ्या प्रमाणात आवास योजनेतून घरे देताना नदीच्या पात्रातील नागरिकांचेदेखील पुनर्वसन महत्त्वाचे आहे. त्यामुळे चांगल्या जागेत घरे देण्यासाठी असणाऱ्या अडचणी व त्यासंदर्भात काय उपाययोजना करता येईल, यासाठी एका उच्चस्तरीय समितीचे गठण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यासंदर्भात लवकरच बैठक घेत असल्याचेसुद्धा सांगितले. याशिवाय कोणते आरक्षण हटवता येते या संदर्भातही अभ्यास करण्याबाबत अधिकाºयांना निर्देश दिले.
कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करा
पोलीस सारथी योजनेचा आढावाही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी घेतला. जिल्हाभरात शाळा-कॉलेजेमध्ये योग्य पद्धतीचा संदेश सर्वांना जाईल, अशी प्रचार यंत्रणा राबविण्याचे निर्देश दिले.गरज भासल्यास कॉल सेंटर आणखी उघडण्यात यावे, यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून महिलांच्या सुरक्षा संदर्भात अतिशय काटेकोरपणे या योजनेची अंमलबजावणी व्हावी, असे यावेळी त्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांना सांगितले. शहरातील काही भागांमध्ये असामाजिक तत्त्वांचा टोळ्या स्टंटबाजी करण्यामध्ये सक्रिय झाल्याचे यावेळी अनेक समितीच्या सदस्यांनी लक्षात आणून दिले. यावर अशा घटकांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

Web Title: The highest resolution in Chandrapur Maharashtra in the housing scheme of Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.